एक्स्प्लोर

Anupamaa : 'अनुपमा'च्या अडचणीत वाढ! मृत्यू की हत्या? AICWA ने निर्मात्यांवर गंभीर आरोप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागितला न्याय

Anupamaa TV Serial : 'अनुपमा' मालिकेच्या सेटवर घडलेल्या अपघातात कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू झाला. हे प्रकरण आता थेट मुख्यमंत्र्‍यांपर्यंत पोहोचलं आहे.

Tragic Accident on Anupamaa Set : टीआरपीच्या शर्यतीत असणारी अनुपमा मालिका कायम चर्चेत असते. आता पुन्हा हा मालिका चर्चेत आली आहे. पण, यामागचं कारण काही वेगळं आहे. रुपाली गांगुलीच्या 'अनुपमा' मालिकेच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसत आहे. 'अनुपमा' मालिकेच्या सेटवर घडलेल्या अपघातात कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण आता थेट मुख्यमंत्र्‍यांपर्यंत पोहोचलं आहे.

रुपाली गांगुलीच्या 'अनुपमा'च्या अडचणीत वाढ! 

अनुपमाच्या मालिकेतील सेलिब्रेशन सीन शूट करताना कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू झाला. गुरुवारी 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. विजेचा धक्का लागल्याने हा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत अनुपमाचे निर्माते आणि वाहिनीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. याप्रकरणी ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसला जबाबदार धरले आहे.

कॅमेरा असिस्टंटच्या मृत्यूचं प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं

ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन या संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. असोसिएशने पत्राद्वारे ही बाब मुख्यमंत्र्‍यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्रात असोसिएशनने अनुपमा मालिकेच्या निर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसविरुद्ध आयपीसी कलम 302 अन्वये एफआयआर दाखल करण्याची आणि पीडित कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

भारतीय चित्रपट उद्योगातील कलाकार आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या AICWA संघटनेने 'अनुपमा' मालिकेच्या सेटवर 32 वर्षीय क्रू मेंबरच्या मृत्यूला हत्या म्हटलं आहे. निर्माते, प्रॉडक्शन हाऊस आणि चॅनल यांच्या निष्काळजीपणामुळे क्रू मेंबरची संस्थात्मक हत्या झाल्याचा आरोप AICWA संघटनेने केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. पत्राची प्रत AICWA च्या अधिकृत X हँडलने शेअर केली आहे.

सिने वर्कर्स संघटनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

ऑल इंडियन सिने वर्कर्स संघटनेने लिहिलेल्या पत्रानुसार, 15 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 वाजता कॅमेरा असिस्टंटचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. कॅमेरा असिस्टंटच्या मृत्यूचं कारण सेटवरील उपकरणांचा निष्काळजी वापर असल्याचं असोसिएशनने म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका कामगाराचा मृत्यू झाल्यानंतरही प्रोडक्शनने रात्री उशिरापर्यंत मालिकेचं शुटींग सुरूच ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशीही शूटिंग सुरूच होतं. प्रॉडक्शन हाऊसने मृत कामगाराच्या कुटुंबीयांना भेटण्याची तसदी घेतली नाही किंवा या संदर्भात कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही.

काय आहेत असोसिएशनच्या मागण्या?

ऑल इंडियन सिने असोसिएशनने म्हटलं आहे की, मालिकांच्या सेटवर अनेकदा जुन्या तारा प्लास्टिकच्या टेपने जोडल्या जातात. त्यामुळे सेटवर काम करणाऱ्या कामगारांसाठी ही जागा मृत्यूचा सापळा बनली आहे. मूलभूत सुरक्षा प्रोटोकॉलही येथे पाळले जात नाहीत आणि त्यामुळे कॅमेऱ्यांच्या मागे काम करणाऱ्या कामगारांच्या अडचणी वाढतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात असोसिएशनने पाच प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.

  1. अनुपमा मालिकेचे निर्माते, प्रोडक्शन हाऊस, चॅनल, फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि कामगार आयुक्त यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात यावा.
  2. दोन मृत कामगारांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी.
  3. जोपर्यंत या प्रकरणाची पूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत अनुपमा आणि या प्रोडक्शन हाऊसच्या सर्व मालिकांच्या शूटिंगवर बंदी घालावी.
  4. सर्व मालिकांच्या सेटवर सेफ्टी प्रोटोकॉल तपासले जावेत आणि जिथे ते पाळले जात नाहीत, तिथे कठोर कारवाई करून त्यांच्यावर दंड आकारला जावा.
  5. एका व्यक्तीच्या मृत्यूला केवळ कचरा समजणाऱ्या सर्वांवर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशी घटना होऊ नये.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rakkayie Teaser : 'लेडी सुपरस्टार' नयनताराच्या आगामी चित्रपटाची झलक! पुष्पा अन् केजीएफला टक्कर देणारा 'रक्कायी' चित्रपटाचा ॲक्शन पॅक टीझर समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6:30 AM :20 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:00 AM : 20 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Attacked : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रमZero Hour Vidhan Sabha Election | मतदानाआधीच राजकीय महाभारत, निवडणूक आयोगाकडून किती कोटी जप्त?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Embed widget