एक्स्प्लोर

Almost Comedy : आता लेखक बनणार कॉमेडीयन! मराठी स्टँडअप कॉमेडी शो' ऑलमोस्ट कॉमेडी'

Almost Comedy : मराठी स्टँडअप कॉमेडी शो'ऑलमोस्ट कॉमेडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो कधी आणि कुठे प्रदर्शित होणार आहे, ते जाणून घ्या.

Almost Comedy : 'ऑलमोस्ट कॉमेडी' हा नवीन मराठी स्टँडअप कॉमेडी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एव्हरेस्ट हास्य मराठी प्रस्तुत या शोकडे आता प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत.  दर्जेदार आणि मनोरंजक कंटेट देणाऱ्या एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने आता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नवा मार्ग शोधला आहे. याशोमधून आता लेखक कॉमेडीयन बनणार आहेत. हा शो कधी आणि कुठे प्रदर्शित होणार आहे, ते जाणून घ्या.

लेखक बनणार कॉमेडीयन

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर 'ऑलमोस्ट कॉमेडी' चे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. मनोरंजक कथा लिहून प्रेक्षकांना हसवणारे लेखक आता प्रत्यक्ष स्टेजवर येऊन आपल्या विनोदी किस्से सांगून प्रेक्षकांना हसवणार आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील काही उत्कृष्ट लेखक प्रथमच स्टेजवर स्टँडअप कॉमेडी सादर करणार आहेत. चेतन डांगे, अमोल पाटील, चिन्मय कुलकर्णी, अक्षय जोशी आणि ऋषिकांत राऊत या लेखकांचा समावेश असणार आहे.  

मराठी स्टँडअप कॉमेडी शो 'ऑलमोस्ट कॉमेडी' 

एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने  ‘प्रेमाची गोष्ट’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘कॉफी आणि बरंच काही’ ‘बॅाईज’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांद्वारे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता प्रेक्षकांच्या मनोरंजनात आणखी भर घालण्यासाठी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट एक धमाकेदार संकल्पना घेऊन येत आहे. प्रेक्षकांना हास्याच्या दुनियेत घेऊन जाण्यासाठी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट सज्ज झाले आहे. 

'ऑलमोस्ट कॉमेडी' म्हणजे फुल ऑन हास्याचा धमाका

एव्हरेस्ट हास्य मराठी प्रस्तुत 'ऑलमोस्ट कॉमेडी' हा धमाकेदार कॉमेडी शो एव्हरेस्ट हास्य मराठी या यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल. एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची ही नवीन संकल्पना प्रेक्षकांसाठी नव वर्षातील खास भेट ठरेल. 'ऑलमोस्ट कॉमेडी' हा शो फक्त एक कॉमेडी शो नसून लेखकांच्या कलागुणांची एक मजेशीर सफर असणार आहे. या शोचा प्रत्येक एपिसोड प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करेल हे नक्की.

View this post on Instagram
 
A post shared by Everest Entertainment Marathi (@everestentertainment)

एव्हरेस्ट एंटरटेमेंटचे संस्थापक संजय छाब्रिया यांनी सांगितलं की, "स्टँडअप कॉमेडी हा मनोरंजनाचा एक वेगळा आणि प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होणारा फॉरमॅट आहे. म्हणूनच ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ हा नवा प्रयोग, नवी संकल्पना आम्ही घेऊन आलो आहे".

महत्त्वाच्या इतर बातम्या :

प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : स्वबळाच्या नाऱ्यानं महाविकास आघाडीत वितुष्ट येईल का? संजय राऊत यांचं दोन शब्दात उत्तर, तर्क वितर्क थांबणार?
स्वबळाच्या नाऱ्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, मविआच्या प्रश्नावर संजय राऊतांनी दोन शब्दात उत्तर देत सगळं स्पष्ट केलं
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!Sakshana Salgar on Santosh Deshmukh:देशमुखांची लेक 12वीत,न्यायासाठी दारोदारी जात रडतेय;वाईट वाटतंय!Beed Santosh Deshmukh Case MCOCA Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मकोकाSuresh Dhas on MCOCA : अजून बऱ्याच लोकांवर मकोका लागणार...सुरेश धसांचा रोख कुणावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : स्वबळाच्या नाऱ्यानं महाविकास आघाडीत वितुष्ट येईल का? संजय राऊत यांचं दोन शब्दात उत्तर, तर्क वितर्क थांबणार?
स्वबळाच्या नाऱ्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, मविआच्या प्रश्नावर संजय राऊतांनी दोन शब्दात उत्तर देत सगळं स्पष्ट केलं
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Mutual Fund : सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढणार
सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये पैसा वाढणार
Manikrao Kokate : भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
Embed widget