एक्स्प्लोर
अजान वाद: अदनान सामी सोनू निगमच्या पाठिशी!

मुंबई: गायक सोनू निगमने मशिदीवरील लाऊडस्पीकरला विरोध केल्याने उफाळलेला वाद अद्याप कायम आहे. मात्र बॉलिवूडचा आणखी एक गायक सोनू निगमच्या पाठिशी उभा राहिला आहे.
अदनान सामीने सोनू निगमचं समर्थन केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना अदनान सामीने सोनू निगमची पाठराखण केली.
"सोनू निगम एक सच्चा आणि प्रेमळ माणूस आहे. सोनू असं बोलू शकत नाही. तो जे म्हणाला त्याचा अर्थ समजून घेतला गेला नाही", असं अदनान म्हणाला.
सोनू निगमकडून अजानचा व्हिडीओ ट्वीट
भारताचं नागरिकत्व स्वीकारलेल्या पाकिस्तानच्या अदनान सामीने, आपण सोनू निगमला अनेक वर्षांपासून ओळखत असल्याचं म्हटलं आहे. सोनू एक चांगला आणि प्रेमळ व्यक्ती असल्याचा पुनरुच्चार त्याने केला. "सोनू कोणाचंही मन दुखावणारा नाही. तो एक साधा माणूस आहे. त्याच्या म्हणणं चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आलं" असं अदनान सामीने नमूद केलं. मशिदींवरील भोंग्यांमुळे माझी झोपमोड का? : सोनू निगम ‘मी मुस्लीम नाही आणि तरीही मला अजानच्या आवाजामुळे झोपेतून उठावं लागतं. भारतातील जबरदस्तीची ही धर्मिकता कधी संपेल?’, असा सवाल गायक सोनू निगमनं केला होता. शिवाय, ‘मोहम्मद यांनी ज्यावेळी इस्लामची सुरुवात केली, त्या काळात वीज नव्हती. मग एडिसननंतर हा कर्कश आवाज का?’, असंही सोनू निगमनं ट्वीटमधून विचारलं. “जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत, त्यांना भोंगे लावून उठवणाऱ्या कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वारावर माझा अजिबात विश्वास नाही.”, असंही ट्वीट सोनू निगमनं केलं होतं. सोनू निगमच्या या ट्वीटनंतर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळल्या. कोणी सोनूचं समर्थन केलं तर कुणी विरोध केला. संबंधित बातम्यासोनू निगमकडून अजानचा व्हिडीओ ट्वीट
सोनू निगमच्या समर्थनार्थ बाबू भाई मैदानात!
पुण्यात सोनू निगमविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज
मशिदींवरील भोंग्यांमुळे माझी झोपमोड का? : सोनू निगम
‘अजान जरुरी, लाऊडस्पीकर नाही’, सोनू निगमच्या ट्वीटवर अहमद पटेलांचं वक्तव्य
‘त्या’ ट्विटनंतर गायक सोनू निगमच्या सुरक्षेत वाढ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
