एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

‘आम्ही कलाकारही माणूस असतो…’, अभिनेत्री स्नेहलता वसईकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत!

Snehlata Vasaikar : स्नेहलताने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत ‘महाराणी सोयराबाई’ यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहोचली होती.

Snehlata Vasaikar : छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री स्नेहलता वसईकर (Snehlata Vasaikar) आपल्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरील वेगवेगळ्या फोटोशूटमुळे चर्चेत असते. स्नेहलताने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत ‘महाराणी सोयराबाई’ यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहोचली होती. मात्र, यानंतर तिने केलेल्या फोटोशूटमुळे अनेकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. यालाच आता अभिनेत्रीने आता चोख उत्तर दिलं आहे.

अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिने तीन फोटो शेअर करून ट्रोल करणाऱ्यांसाठी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. यातून तिने आपल्या भावना शब्दांत मांडत तिने ट्रोलर्सला उत्तर दिले आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

स्नेहलताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तीन फोटो शेअर केले आहेत आणि सोबतच्या पोस्टमध्ये तीन कॅप्शन लिहिले आहेत. स्नेहलता लिहिते, ‘कॅप्शनऐवजी आज हे नक्की वाचा... नमस्कार मी स्नेहलता वसईकर, अर्थातच अभिनेत्री असल्यामुळे वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून मी आपल्या समोर येतं असते. माझ्या प्रत्येक भूमिकेवर मायबाप रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं... काही चुकलं तर समजूनही घेतलंत. ऐतिहासिक भूमिकांपासून मॉडर्न भूमिका असा प्रवास केला. प्रत्येक भूमिकेतून, अनुभवांमधून खूप गोष्टी शिकले. अजूनही वैविध्यपूर्ण भूमिका साकारायच्या आहेत, त्यातूनही अनेक गोष्टी शिकायच्या आहेत.... पण काय सांगू...? हे ट्रोलर्स....

(पोस्ट मधील पहिला फोटो), कधी-कधी असंच कमरेवर हात ठेऊन या ट्रोलर्सबरोबर भांडव असं वाटतंय... त्यांना सांगावस वाटतं, तुमच्यावरील ‘संस्कार’ तुमच्या कपड्यांवरून नाही तर तुमच्या विचारांमधून कळतात. थोरा-मोठ्यांचे गुण आपल्या अंगी उतरवायचे असतात, त्यातील अनेक गोष्टी आपल्या आचरणात आणायच्या असतात... एवढं सगळं बोलूनही ‘ट्रोलर्स’ना मात्र काही कळणार नाही, न त्यांच्या वागण्या-बोलण्यात, सोशल मीडियावर व्यक्त होण्यात काही बदल होणारं आहे. याउलट त्यांच्या चुकीच्या वक्तव्याचा, कमेंट्सचं ते समर्थन आणि काही जण त्यांची पाठराखण करतात...

म्हणून (हा दुसरा फोटो), त्यांच्यात न झालेला बदल पाहून, ‘पालथ्या घड्यावर पाणी...’ म्हणत स्वतःचं डोक्यावर हात मारून घ्यावासा वाटतो... कलाकार हा आशावादी सुद्धा असतो. ‘मी एक कलाकार आहे आणि माझं एक खाजगी आयुष्य सुद्धा आहे तुम्ही समजून घ्याल’, अशी आशा करते. ऐतिहासिक मालिकेमधून भूमिका साकारताना त्या व्यक्तिरेखेशी प्रामाणिक राहण्याचा पूर्ण प्रयत्न असतो आणि ते थोर व्यक्तिमत्व म्हणजे आपण नव्हे याचं भानही... आम्ही कलाकार फक्त निमित्तमात्र असतो. जर अशा भूमिका साकारल्यानंतर त्या थोर व्यक्तिमत्त्वांचा जागी आम्हाला नेऊन बसवत असाल तर त्या थोर व्यक्तिमत्त्वांचा याहून मोठा अपमान काहीच नसेल…. पुन्हा सांगते मी रील आणि रियल लाईफ ही वेगवेगळी ठेवणच पसंत करते.

म्हणून (हा तिसरा फोटो) हाताची घडी घालून निवांत.....तुम्हा मायबाप प्रेक्षकांना माझी बाजू समजावून सांगण्याची तशी फार गरज नाही हे मला ठाऊक आहे... फक्त, आम्ही कलाकारही माणूस असतो.... वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी भुकेलेला...’

पाहा पोस्ट :

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  3 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDeepak Kesarkar On Eknath Shinde : शिंदेंना योग्य तो मान मिळावा, दिपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Embed widget