एक्स्प्लोर
Advertisement
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून राणादाची एक्झिट?
झी मराठीवरील लोकप्रिय 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत हार्दिक जोशी साकारत असलेल्या राणादाची भूमिका संपणार असल्याची चर्चा रंगली आहे. वाहिनीकडून मात्र या वृत्ताचा इन्कार करण्यात आला आहे
मुंबई : आयुष्यातल्या प्रत्येक संकटाला निर्भिडपणे सामोरं जाणारा 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतला राणादाच मोठ्या संकटात अडकला आहे. हे संकट एवढं मोठं आहे, की त्याला थेट मालिकाच सोडावी लागू शकते. मालिकेतल्या एका सीनचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर राणादा अर्थात अभिनेता हार्दिक जोशीच्या एक्झिटच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
झी मराठीवरील लोकप्रिय 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतला हा बहुचर्चित सीन आहे राणादाच्या हत्येचा. पप्या पाटील राणादाला संपवण्यासाठी जीवघेणा हल्ला करतो, असा सीन नुकताच चित्रित करण्यात आला. राणादा या हल्ल्यातून सहीसलामत वाचला तर काहीच प्रॉब्लेम नाही पण जर पप्याचा गेम यशस्वी झाला तर मात्र राणाची भूमिका करणाऱ्या हार्दिकला मालिकेला टाटा-बाय बाय करावा लागेल.
राणादाने चुकून माकून एक्झिट घेतलीच, तर त्याच्या जागी मालिकेला हिरो हवाच. त्यामुळे त्याची जागा कोण घेणार, हे गुपितही एका बंद कुपीत ठेवण्यात आलं आहे.
ढॅण्टढॅण: 'तुझ्यात जीव रंगला'मध्ये लाडूची एण्ट्री कशी झाली? लाडूचे भन्नाट किस्से
हार्दिकने यावर आपल्याला काहीच माहित नाही, असं सांगितलं. स्क्रीनप्लेनुसार ज्या घटना घडत जातील, त्यानुसार पुढच्या गोष्टी ठरतील असं त्याचं म्हणणं आहे. तर असं काहीच घडणार नसल्याचं चॅनेलचं म्हणणं आहे.
राणा दा आणि पाठक बाई यांची केमिस्ट्री सुरुवातीपासूनच हिट आहे. अभिनेत्री अक्षया देवधरचेही तूफान चाहते आहेत. गेल्या तीन वर्षांपासून या मालिकेचे प्रेक्षक संध्याकाळी साडेसात वाजण्याची आतुरतेने वाट पाहत असतात.
जे काही असेल ते दोन दिवसात कळेलच, मात्र या बातमीने राणादाच्या फॅन्सची धकधक चांगलीच वाढली असेल एवढं मात्र नक्की.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
क्राईम
सोलापूर
Advertisement