Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' मालिकेत पुष्पवल्लीच्या भूमिकेत दिसणार अभिज्ञा भावे
Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' या मालिकेत अभिज्ञा भावे पुष्पवल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे.
Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' (Tu Tevha Tashi) ही मालिका येत्या 20 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेतील अभिज्ञा भावेची (Abhidnya Bhave) भूमिका खास असणार आहे. अभिज्ञा भावे या मालिकेत पुष्पवल्लीची भूमिका साकारणार आहे.
अभिज्ञा भावे तिच्या भूमिकेबद्दल म्हणाली,"प्रेक्षकांनी मला आजवर अनेक नकारात्मक भूमिकांमध्ये पाहिलं आहे. तसेच माझ्या प्रत्येक भूमिकेवर भरभरून प्रेम केलं आहे. पण 'तू तेव्हा तशी' मालिकेतील भूमिका खूपच वेगळी आहे. पुष्पवल्लीला पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल याची मला खात्री आहे."
View this post on Instagram
अव्यक्त प्रेमाची गोष्ट 'तू तेव्हा तशी' मालिकेत दाखवण्यात येणार आहे. मंदार देवस्थळी या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहे. 'तू तेव्हा तशी' मालिकेतील अभिज्ञा भावेची भूमिका खास असणार आहे. अभिज्ञा भावेने साकारलेली पुष्पावल्ली छोटा पडदा गाजवणार आहे. प्रेक्षक या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या
RRR Sholay Viral : 'बाहुबली'च्या राजामौलीने 'साऊथ'मध्ये करुन दाखवलं, छत्रपती शिवाजी महाराजांची अंगावर काटा आणणारी फ्रेम
The Kashmir Files : व्हॉट्सअप लिंकवरून 'द कश्मीर फाइल्स' डाऊनलोड करताय? मग तुमचेही बँक खाते रिकामं होऊ शकतं, तिघांना 30 लाखांचा फटका
The Kashmir Files : शूटिंगमध्ये चिन्मय मांडलेकरला द्याव्या लागल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा! पाहा नेमकं काय झालं...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha