Abhidnya Bhave: कॉलेजमध्ये झाली भेट, मैत्रीचं रुपांतर झालं प्रेमात; अशी आहे अभिज्ञा आणि मेहुल यांची प्यारवाली लव्ह स्टोरी
Abhidnya Bhave: एका मुलाखतीमध्ये अभिज्ञा भावेनं तिच्या आणि मेहुलच्या लव्हस्टोरीबाबत सांगितलं.
Abhidnya Bhave: अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) ही चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. अभिज्ञा तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. अभिज्ञानं मेहुल पै (Mehul Pai) याच्यासोबत लग्नगाठ बांधली. अभिज्ञा अनेकवेळा मेहुलसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिज्ञा भावेनं तिच्या आणि मेहुलच्या लव्हस्टोरीबाबत सांगितलं.
अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिज्ञानं तिच्या आणि मेहुलच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं होतं. अभिज्ञानं मुलाखतीमध्ये म्हणाली, 'मेहुल आधी माझा मित्र होता. त्यानंतल तो नवरा झाला. मला तो आधी आवडायचा नाही. मला तो अॅटिट्युड असणारा मुलगा वाटत होता. पण तो माणूस म्हणून खूप वेगळा आहे. तो प्रोडक्शनमध्ये काम करतो. तो आधी इव्हेट्स करायचा. पण आता प्रोडक्शनमध्ये आहे.'
'आमची भेट कॉलेजमध्ये असताना झाली. आमचा एक कॉमन ग्रुप होता. आम्ही तेव्हा जास्त बोलायचो नाही. पण नंतर आमची मैत्री झाली. तो खूप शांत आहे आणि मी बडबड करते. त्यामुळे मला असं वाटलं की तो माझ्यासाठी परर्फेक्ट आहे.' असंही अभिज्ञानं सांगितलं.
अभिज्ञा आणि मेहुल 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्न सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
View this post on Instagram
चाहत्यांच्या रिअॅक्शन्सबाबत अभिज्ञानं सांगितलं, 'मी खूप नकारात्मक भूमिका केल्या आहेत. त्यामुळे चाहते भेटल्यानंतर म्हणताता, तुम्ही फारच वेगळ्या आहात.' सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत अभिज्ञा म्हणाली, 'मला अनेक वेळा ट्रोल गेलं आहे. माझे घरचे पण कमेंट्स वाचतात त्यामुळे माझ्यावर ट्रोलिंगचा फरक पडतो. ' अभिज्ञा ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.
View this post on Instagram
अभिज्ञानं केलं या मालिकांमध्ये काम
खुलता कळी खुलेना,तुला पाहते रे, तू तेव्हा तशी या मालिकांमध्ये अभिज्ञानं काम केलं, तुला पाहते रे या मालिकेमध्ये तिनं मायरा ही भूमिका साकारली होती. तसेच अभिज्ञानं लंगर, जग्गू आणि जुलियट या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Abhidnya Bhave : अभिनेत्री अभिज्ञा भावेची खास पोस्ट; म्हणाली, 'थेरपीच्या काळात आम्ही...'