Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेने पार केला 700 भागांचा टप्पा; टीआरपीच्या शर्यतीतदेखील अव्वल
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' या मालिकेने 700 भागांचा टप्पा पार केला आहे.
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत या मालिकेने 700 भागांचा टप्पा पार केला आहे. मागील तीन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे.
अनेकदा टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका पहिल्या क्रमांकावर असते. एक चांगला विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम 'आई कुठे काय करते' या मालिकेने केले आहे. त्यामुळेच आता या मालिकेने 700 भागांचा टप्पा गाठला आहे. नुकताच या मालिकेचा 700 वा भाग प्रदर्शित करण्यात आला आहे. स्टार प्रवाह वाहिनीने एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
स्टार प्रवाहने पोस्ट शेअर करत लिहिले आहे,"आज 'आई कुठे काय करते !' मालिकेचा 700 वा एपिसोड सादर होत आहे. आपण या 700 भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..! त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..! आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..!"
View this post on Instagram
'आई कुठे काय करते' मालिकेत नुकताच वटपौर्णिमा विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. मालिकेत संजना आणि अनघा त्यांची पहिली वटपौर्णिमा साजरी करताना दिसणार आहेत. 'आई कुठे काय करते' या मालिकेत नेहमीच वेगवेगळे ट्विस्ट येत असतात. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
संबंधित बातम्या