Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते'मधील अभिनेता झळकणार 'झी मराठी'च्या मालिकेत
Aai Kuthe Kay Karte : छोट्या पडद्यावर मागील काही वर्षांपासून लोकप्रिय असलेल्या 'आई कुठे काय करते' या मालिकेत आता मोठी घडामोड घडली आहे. या मालिकेतील अभिनेता आता 'झी मराठी'वर झळकणार आहे.
Aai Kuthe Kay Karte : छोट्या पडद्यावर टीआरपीची स्पर्धा जोर पकडू लागली आहे. मराठी वाहिन्यांमध्ये 'स्टार प्रवाह' वाहिनीचा (Star Pravah) दबदबा कायम असून 'झी मराठी'कडून (Zee Marathi) आव्हान देण्याचा प्रयत्न होत आहे. छोट्या पडद्यावर मागील काही वर्षांपासून लोकप्रिय असलेल्या 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte ) या मालिकेत आता मोठी घडामोड घडली आहे. या मालिकेतील अभिनेता आता 'झी मराठी'वर झळकणार आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेतील सगळेच कलाकार लोकप्रिय आहेत. या मालिकेतील कलाकार अद्वैत कडणे हा आता झी मराठीवर दिसणार आहे. अद्वैतने आई कुठे काय करते या मालिकेत ईशाच्या पहिल्या प्रियकराची भूमिका साकारली. या व्यक्तीरेखेतून त्याने लोकप्रियता मिळवली. आता अद्वैत कडणे हा 'झी मराठी'वर झळकणार आहे.
कोणत्या मालिकेत दिसणार अद्वैत?
अद्वैत कडणे हा झी मराठीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत अद्वैत हा लीलाची बहीण रेवतीच्या बॉयफ्रेंडच्या भूमिकेत दिसणार आहे. अद्वैतच्या या व्यक्तीरेखेचे नाव विक्रांत असणार आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता, या मालिकेत कथानकात अनेक घडामोडी घडणार आहेत. अद्वैत कडणे याने याआधी 'जाऊ नको दूर बाबा!', 'फुलपाखरू', 'अग्निहोत्र 2' या मालिकेमध्ये काम केले.
'आई कुठे काय करते' मालिकेची वेळ बदलली
'आई कुठे काय करते' ही मालिका आधी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. 18 मार्च 2024 पासून ही मालिका सोमवार ते शनिवार दुपारी 2.30 वाजता स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेच्या वेळेवर आता 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका प्रसारीत होते.
'आई कुठे काय करते' मालिकेचे चाहते नाराज
'आई कुठे काय करते' या मालिकेत एक धक्कायदायक वळण आलं आहे. या नव्या ट्वीस्टवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. अरुंधतीला सुखात असलेली का दाखवत नाही, आशुतोषपेक्षा अनिरुद्धला मारायचं होतं, 'आई कुठे काय करते' आवडती मालिका होती. पण आता पाहणं बंद करणार, अजून किती नवरे बदलणार आहेस, नवीन प्रवासात आणि नव्या वेळेत तुझ्या लेकीलाही हेच संस्कार दे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी करत आपली नाराजी दर्शवली आहे.