Aai Kuthe Kay Karte: 'ईशासारखी स्वार्थी मुलगी...'; आई कुठे काय करतेचा प्रोमो पाहिल्यानंतर ईशावर भडकले नेटकरी
आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. या मालिकेमध्ये अनेक ट्वीस्ट अँड टर्न येत असतात. नुकताच आई कुठे काय करते या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अनिरुद्ध हा ईशावर चिडला आहे.
प्रोमोमध्ये दिसत आहे की, ईशा आणि अनिश हे देशमुख कुटुंबाच्या घरी आले आहेत. त्यांना पाहून सगळे आनंदी होतात. पण अनिरुद्ध चिडतो. ईशा अनिरुद्धला म्हणते, बाबा मला मान्य आहे, "मी तुम्हाला खूप त्रास दिला आहे." यावर अनिरुद्ध म्हणतो, 'मला परक्या माणसानं त्रास दिल्यानंतर अजिबात वाईट वाटत नाही. या मुलीशी माझा काहीही संबंध नाही. मला फक्त दोन मुलं आहेत असं मी समजतो.'
जेव्हा गुरुजी पुजा करणाऱ्या जोडप्यानं पुढे या असं म्हणतात. तेव्हा ईशा आणि अनिश हे पुढे जातात. पण आजी त्यांना म्हणते,"थांबा. अभी, अनघा तुम्ही पूजा करायला बसा"
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
आई कुठे काय करते या मालिकेचा हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी ईशावर भडकले आहेत. एका नेटकऱ्या या प्रोमोला कमेंट केली, "ईशा ही तिच्या वडिलासारखीच स्वार्थी मुलगी आहे." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "ईशासारखी स्वार्थी मुलगी आजपर्यंत मी पाहिली नाही.", "तिला इंदूर लाच पाठवा कायमचा" अशी कमेंट एका युझरनं केली आहे.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
"आजीने ईशा-अनिशला पूजेला बसण्यापासून थांबवलं." असं कॅप्शन आई कुठे काय करते या मालिकेच्या प्रोमोला देण्यात आलं आहे. आता ईशा आणि अनिश पूजा करणार की अभी आणि अनघा अनघा पूजा करणार, हे प्रेक्षकांना 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेत मधुराणी प्रभूलकर या अरुंधती ही भूमिका साकारतात. तर अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी हे साकारतात. या मालिकेतील ईशा ही भूमिका अपूर्वा गोरे ही साकारते.
इतर महत्वाच्या बातम्या: