(Source: ECI/ABP News/ABP Majha)
DID Super Moms : डीआयडी सुपर मॉम्सच्या मंचावर थिरकली 76 वर्षाची आजी; डान्स पाहून परीक्षक झाले थक्क
DID Super Moms : नुकताच सोशल मीडियावर डीआयडी सुपर मॉम्स (DID Super Moms) या कार्यक्रमामधील एक व्हिडीओ व्हायरल झाला.
DID Super Moms : डीआयडी सुपर मॉम्स (DID Super Moms) हा शो 2 जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar),भाग्यश्री (Bhagyashree) आणि रेमो डिसूजा (Remo D'Souza) हे या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत. सध्या या कार्यक्रमाचे ऑडिशन्स सुरु आहे. नुकताच सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये 76 वर्षाची लक्ष्मी आजी ही डीआयडी सुपर मॉम्सच्या मंचावर थिरकताना दिसत आहे.
76 वर्षाच्या लक्ष्मी आजीनं सैराट चित्रपटातील झिंगाट या गाण्यावर डान्स केला. त्यांचा डान्स पाहून कार्यक्रमाचे परीक्षक हे मंचावर आले. परीक्षकांनी आजीच्या डान्सचं कौतुक केलं. 'यांचा उत्साह आणि डान्स पाहून अनेक जण थक्क झाले. हा परफॉर्मेन्स बघण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात?' असं कॅप्शन या व्हायरल व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हायरल व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन आजीच्या डान्सचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ' हे पाहून मला माझ्या आजीची आठवण येत आहे. '
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
परीक्षकांना दिले पैसे
उर्मिला मातोंडकर, भाग्यश्री आणि रेमो डिसूजा यांना आजीनं प्रत्येकी 10 रुपये आशीर्वाद म्हणून दिले. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आजीनं परीक्षकांच्यासोबत देखील डान्स केला. शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता डीआयडी सुपर मॉम्स हा कार्यक्रम पाहू शकता.
देशभरात 'डीआयडी सुपर मॉम्स' या कार्यक्रमाच्या ऑडिशन्सला सुरुवात झाली आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, भोपाळ, चंदीगड, लखनौ आणि गुवाहाटी या शहरांमध्ये 'डीआयडी सुपर मॉम्स' कार्यक्रमाचे ऑडिशन्स होणार आहेत.
एका मुलाखतीमध्ये उर्मिलानं सांगितलं, 'डीआयडी सुपर मॉम्स या नव्या जर्नीची सुरूवात करण्यासाठी मी उत्सुक आहे. मी या कार्यक्रमाचा भाग असल्याचा मला आनंद वाटतो. हा कार्यक्रम नृत्याची आवड असणाऱ्या महिलांसाठी खास असणार आहे. मी रेमोसोबत या कार्यक्रमाचे परीक्षण करण्यासाठी आणि सुपर मॉम्सचे परफॉर्मन्स पाहण्यासाठी उत्सुक आहे. '
हेही वाचा:
Urmila Matondkar : उर्मिला मातोंडकर करणार छोट्या पडद्यावर पुरागमन; 'या' कार्यक्रमाचे करणार परीक्षण