एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

Zee Marathi New Upcoming Serial: तेजश्री-सुबोधच्या नव्या मालिकेचा प्रोमो बघताच प्रेक्षक संतापले, हिंदीतील सिरीयलची डिट्टो कॉपी?

Tejashri Pradhan Subodh Bhave New Serial On Zee Marathi: 'झी मराठी'च्या नव्या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. तसेच, या मालिकेत कोणती जोडी स्क्रिन शेअर करणार याचाही खुलासा झाला आहे. 'झी मराठी'वर येऊ घातलेल्या मालिकेत अभिनेत्री  तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.

Tejashri Pradhan Subodh Bhave New Serial On Zee Marathi: 'झी मराठी'नं (Zee Marathi) त्यांच्या आगामी मालिकेची घोषणा काही दिवसांपूर्वी केलेली. तेव्हापासूनच या मालिकेबाबत जोरदार चर्चा रंगली होती. आधी मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला होता. त्या प्रोमोवरुन प्रेक्षकांनी मालिकेत झळकणाऱ्या जोडीबाबत अंदाज बांधला होता. अखेर झी मराठीनं आणखी एक प्रोमो रिलीज केला असून आता या मालिकेत कोण झळकणार? याबाबत खुलासा झाला आहे. 

'झी मराठी'च्या नव्या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. तसेच, या मालिकेत कोणती जोडी स्क्रिन शेअर करणार याचाही खुलासा झाला आहे. 'झी मराठी'वर येऊ घातलेल्या मालिकेत अभिनेत्री  तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) आणि अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच आता मराठीतीली दोन लोकप्रिय सेलिब्रिटी एकाच मालिकेत पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. 

अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या मालिकेची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर या मालिकेचे नाव काय असणार? सुबोध-तेजश्री कोणत्या भूमिका साकारणार? त्यांचा लूक काय असणार? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं समोर आली आहेत. मराठी मालिकाविश्वातील या आघाडीच्या कलाकारांच्या मालिकेचा पहिलावहिला प्रोमो 24 जून रोजी रात्री रीलिज करण्यात आला. 'हॅशटॅग तदेव लग्नम' या चित्रपटात एकत्र दिसलेल्या तेजश्री आणि सुबोध या जोडीला छोट्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये काय दाखवण्यात आलंय? 

सुबोध, तेजश्रीच्या नव्या मालिकेचं नाव 'वीण दोघांतली ही तुटेना' असं असणार आहे. 'झी मराठी'च्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. प्रोमो शेअर करताना 'नियतीने जोडी जुळवली की ठरवून 'लग्न' होतं आणि न ठरवता 'प्रेम'', असं कॅप्शन देण्यात आलं आहे. 

'झी मराठी'नं मालिकेचा प्रोमो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला. या प्रोमोमध्ये तेजश्री आणि सुबोध भावे एकमेकांशी बोलत असल्याचं पाहायला मिळतंय. सुबोध आणि तेजश्री यांच्या पात्रांची एका हॉटेलमध्ये भेटतात. मालिकेत सुबोधचं नाव समर आणि तेजश्रीचं नाव स्वानंदी आहे. समरला स्वतःच्या आजूबाजूला स्वच्छता, साफसफाई आवडते. तर, त्या हॉटेलमधली टेबलवरची प्रत्येक गोष्ट तो जागच्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करतो. मेन्यूकार्डसह कोणत्याही गोष्टीला हात लावताना त्यावर सॅनिटायझर स्प्रे करतो. त्याचं हे वागणं पाहून स्वानंदी आश्चर्यचकीत होते. त्यानंतर तो केवळ स्वतःसाठी नॉनव्हेज पदार्थांची एक भलीमोठी ऑर्डर देतो. इतके त्याला भेटायला आलेली स्वानंदी मात्र शाकाहारी आहे. तिला तो काहीच विचारत नाही. त्यानंतर स्वानंदी दाल-खिचडी ऑर्डर करते.

View this post on Instagram
 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

खाण्यासाठी ऑर्डर दिल्यानंतर समर आणि स्वानंदीमधल्या खऱ्या संवादाला सुरुवात होते. स्वानंदी म्हणते की, "आपण लग्न साध्या पद्धतीने करुया, डेस्टिनेशन वेडिंग नको." त्यावर समर असं उत्तर देतो की, लग्न डेस्टिनेशन वेडिंगच असेल... समरनं लग्नाबाबत आधीच ठरवलंय. त्यावरही स्वानंदी चकीत होते. ती विचारते की, "सगळं ठरवलंय तुम्ही, मग आपण का भेटलोय?" त्यावर समर लगेच तिला म्हणतो की, "मी काय ठरवलंय ते तुम्हालाही कळलं पाहिजे ना." ते ऐकून स्वानंदी उठते आणि तिथून निघून जाते. तेवढ्यात समर तिला थांबवतो आणि म्हणतो की, "मिस स्वानंदी आपण आपल्या लग्नाबद्दल काहीच बोललो नाहीये. तेव्हा स्वानंद म्हणते की, त्याबद्दल काय बोलायचं, ते तर ठरलेलंच आहे.

प्रोमोची सुरुवात पाहिल्यानंतर आधी वाटतं की, समर आणि स्वानंदी त्यांच्याच लग्नाबाबत बोलत आहे. पण, प्रोमो पुढे गेल्यानंतर कळतं की, स्वानंदी आणि समरला काही कारणास्तव एकमेकांशी लग्न करावं लागणार आहे. प्रोमोमध्ये पुढे त्यांचा साखरपुडा दाखवला आहे. तेव्हा स्वानंदी समरला म्हणते की, ती तिच्या भावासाठी हे लग्न करतेय. तर समर तिला उत्तर देतो की, तोदेखील त्याच्या बहिणीच्या सुखासाठी हे लग्न करतो आहे. आता यामागे नेमके काय कारण आहे, हे मालिका सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

प्रोमो पाहून नेटकरी संतापले

तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेंच्या सुपरहिट मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. या निमित्तानं 'खुलता कळी खुलेना' या मालिकेची प्रेक्षकांना आठवण झाली आहे. मालिकेचं नाव देखील झी मराठीच्याच खुलता कळी खुलेना या जुन्या मालिकेतील टायटल साँगमधील एक ओळ आहे. मालिकेच्या टायटल साँगमध्येही जुन्या मालिकेतील गाणं ऐकायला मिळतंय. तसेच, लोकांनी या मालिकेच्या प्रोमोची तुलना हिंदी टेलिव्हिजन वरील सुपरहिट मालिका 'बडे अच्छे लगते हो' सोबत केली आहे. तसेच, कमेंट करत काही ओरिजनल आहे काय? अशी विचारणाही केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'दोन-तीन वेळा भेटलो, काही महिन्यांपर्यंत...'; हार्दिक पांड्यासोबतच्या अफेअरवर प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोडलं मौन, नेमकं काय घडलं? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pimpri NCP: पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका-पुतण्यांची आघाडी होणार? की काँग्रेस, शिवसेना बिघाडी करणार?
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Kothrud Girl Case : मुलींना शिवीगाळ करणाऱ्या मुलींना सस्पेंड करा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Bihar Election Result 2025: बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
खळबळजनक! प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू; वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
खळबळजनक! प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू; वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
Home :  स्वप्नातील घर खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टींवर लक्ष ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता
नवं किंवा जुनं घर, दुकान खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा मोठा फटका बसण्याची शक्यता
...तर पिंपरी चिंचवडच्या 128 जागा स्वबळावर लढणार; श्रीरंग बारणेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा
...तर पिंपरी चिंचवडच्या 128 जागा स्वबळावर लढणार; श्रीरंग बारणेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा
Embed widget