Devmanus Posters: लव फिल्म्सचा मल्टीस्टारर चित्रपट 'देवमाणूस'चं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; कलाकारांचे लूक रिवील!
Devmanus Posters: रिलीज झालेल्या या पोस्टर्समध्ये आपण चित्रपटाच्या मुख्य पात्रांचे अतिशय मोहक फर्स्ट लूक पाहू शकतो. अभिनेते महेश मांजरेकर यांचा खूपच साधा पण इंटेन्स लूक आपल्याला दिसून येतो.

Devmanus Posters: तेजस देऊस्कर (Tejas Deoskar) दिग्दर्शित आणि लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित मल्टीस्टारर मराठी चित्रपट 'देवमाणूस'ची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत आणि नुकतेच या चित्रपटात असलेल्या कलाकारांचे पोस्टर्स लाँच करण्यात आले आहेत. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar), रेणुका शहाणे (Renuka Shahane), सुबोध भावे (Subodh Bhave) आणि सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) अशा या दिग्गज आणि पॉवरहाऊस कलाकारांचं वैशिष्ट्य असलेले पोस्टर्स चाहत्यांना सिनेमात असलेल्या त्यांच्या प्रभावशाली स्वरूपाची एक झलक देतात, जे नक्कीच रिलीज होणाऱ्या बहुप्रतिक्षित 'देवमाणूस' टीझरच्या अपेक्षा वाढवतात.
रिलीज झालेल्या या पोस्टर्समध्ये आपण चित्रपटाच्या मुख्य पात्रांचे अतिशय मोहक फर्स्ट लूक पाहू शकतो. अभिनेते महेश मांजरेकर यांचा खूपच साधा पण इंटेन्स लूक आपल्याला दिसून येतो, त्यांची भेदक नजर त्यांच्या या भूमिकेची गंभीरता सांगते. अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा मायाळू, सरळ देखावा आणि मनमोहक लूक लक्ष वेधून घेणारा आहे, तर सुबोध भावे यांना पोलिसांच्या हटके भूमिकेत पाहू शकतो. तसेच, अभिनेता सिद्धार्थ बोडके त्याच्या हसण्यानं सिनेमाचं आणि त्याच्या भूमिकेचं रहस्य वाढवतो. अशा या अनोख्या पोस्टर्समुळे टीझरमध्ये नक्की काय असणार? याची उत्सुकता सर्वांना आहे.
दरम्यान, लव फिल्म्स प्रस्तुत, 'देवमाणूस' या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केलं आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांची निर्मिती असलेला हा चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























