Tanushree Dutta Sister Is Top Bollywood Actress: तनुश्री दत्ताची सख्खी बहिण आहे, बॉलिवूडची स्टार अभिनेत्री; दोन चित्रपटांमध्ये साकारलेली अजय देवगणच्या मुलीची भूमिका, ओळखलं का कोण?
Tanushree Dutta Sister Is Top Bollywood Actress: तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण नाना पाटेकरांवर गंभीर आरोप करणाऱ्या तनुश्री दत्ताची सख्खी बहीण बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Tanushree Dutta Sister Is Top Bollywood Actress: कधी बोल्ड सीनमुळे, कधी हॅशटॅग मीटूमुळे चर्चेत असलेली अभिनत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) आणि पुन्हा एका नव्या कारणामुळे चर्चेत आलीये. तनुश्रीनं ढसाढसा रडत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आणि सगळीकडे खळबळ माजली. तनुश्रीनं पुन्हा एकदा नाना पाटेकरांवर (Nana Patekar) गंभीर आरोप केलेत. तसेच, सुशांत सिंह राजपूतला जो त्रास सहन करावा लागला, तोच आपल्यालाही सहन करावा लागला, असंही तनुश्री दत्ता म्हणाली आहे. कधीकाळी सुपरहिट सेलिब्रिटी असलेल्या तनुश्री दत्तानं पहिल्यांदाच आरोप केलेले नाहीत. यापूर्वीही असे अनेक आरोप तनुश्रीनं केले आहेत. तनुश्री दत्तानं एकदा बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणवरही टीका केली होती. बलात्काराचे आरोप असलेले आरोपी अलोकनाथ यांच्यासोबत काम करण्यावरुन तनुश्रीनं अजय देवगणला (Ajay Devgn) घेरलं होतं.
जेव्हा अजय देवगणच्या समर्थनात धावून आली तनुश्रीची बहीण
तनुश्री दत्ताच्या बहीणीचा समावेश बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये होतो. तनुश्रीनं अजय देवगणवर आरोप केल्यानंतर तिचीच सख्खी बहीण इशिता दत्ता (Ishita Dutta) अजय देवगणसाठी धावून आली होती. ती म्हणालेली की, यामुळे कदाचित मी फारच अवघड परिस्थितीचा सामना करू शकते. पण, जे खरं आहे, तेच खरं आहे. माझी बहीण सत्याचे समर्थन करतेय, अजय सरांशी माझं नातं वेगळं आहे आणि त्याचा माझ्या बहिणीच्या भावनांशी काहीही संबंध नाही. मला वाटत नाही की, अजय देवगण तिच्या बोलण्यावर रागवेल. इशिता तिला पाठिंबा देत म्हणाली की, अजय सर चित्रपट निर्माते नाहीत, म्हणून ते पूर्णपणे जबाबदार असू शकत नाहीत. हा एक ग्रुप डिसिजन आहे, मला वाटतं की, ते याबद्दल काहीही करू शकत नाहीत.
दरम्यान, आलोक नाथ अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे' चित्रपटात दिसला होता, त्यानंतर तनुश्री दत्तानंही अजय देवगणवर बलात्काराच्या आरोपीला पाठिंबा देण्याचा आरोप केला.
तनुश्री दत्तानं अजय देवगणसोबत दोन फिल्म्स केल्यात
तनुश्री दत्ताची बहीण इशिता दत्तानं अजय देवगणसोबत त्याच्या 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे, ज्यामध्ये तिनं अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली आहे. असं म्हटलं जातं की, इशिता दत्ता लवकरच त्याच्यासोबत 'दृश्यम 3' मध्येही दिसणार आहे. तर इशिता दत्ता आणि तिचा पती अभिनेता वत्सल सेठ हे काजोलचे जवळचे मित्र आहेत. दोघेही अनेकदा एकमेकांच्या कुटुंबियांसोबत सेलिब्रेशन करताना दिसलेत. विशेष म्हणजे, काजोल आणि वत्सल सेठ यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजेच, 5 ऑगस्ट रोजी येतो. एवढंच नाही तर वत्सल सेठ 'टार्जन द वंडर कार'मध्ये अजय देवगणच्या मुलाची भूमिका साकारताना दिसला आहे.
दरम्यान, 22 जुलै रोजी तनुश्री दत्तानं सोशल मीडियावर ढसाढसा रडत एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये तिनं स्वतःच्याच घरात तिचं शोषण होत असल्याचं उघड केलं होतं. यामुळे कंटाळून तिनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि गेल्या चार-पाच वर्षांपासून तिचा छळ होत असल्याचं सांगितले. ती म्हणाली की, मी कोणतंही काम करू शकत नाही. तसेच, ABP माझाशी बोलताना तनुश्रीनं नाना पाटेकर आणि बॉलिवूडची माफिया गँग मला त्रास देतेय, असाही आरोप केलेला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























