Kuch Kuch Hota Hai Anjali Is Now 36 Years: 'कुछ कुछ होता है'ची छोटी अंजली झालीय 36 वर्षांची; यंग ब्युटीफुल लेडीचे फोटो पाहिलेत का?
Kuch Kuch Hota Hai Anjali Is Now 36 Years: करण जोहर दिग्दर्शित 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात दिसलेली चिमुकली अंजली आता कशी दिसते, माहितीय?

Kuch Kuch Hota Hai Anjali Is Now 36 Years Young Beautiful Lady: बॉलिवूडच्या (Bollywood News) काही कल्ट सिनेमांपैकी (Hindi Movies) एक म्हणजे, 'कुछ कुछ होता है...' (Kuch Kuch Hota Hai). काजोल (Kajol), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि रानी मुखर्जीच्या (Rani Mukerji) त्रिकुटानं या सिनेमात धुरळा उडवला होता. पण, या सिनेमाच्या कथानकात या तीन स्टार्सना जोडणारं एक पात्र होतं, ते म्हणजे, शाहरुख खान आणि रानी मुखर्जीची लाडकी मुलगी अंजलीचं. पण, तुम्हाला माहितीय का? 27 वर्षांपूर्वी छोट्या अंजलीची भूमिका साकारलेली चिमुकली अंजली आता दिसते तरी कशी?
करण जोहर दिग्दर्शित 'कुछ कुछ होता है' (Kuch Kuch Hota Hai Movie) हा चित्रपट आठवत असेलच. 1998 मध्ये आलेला हा चित्रपट प्रचंड यशस्वी झालेला. हा चित्रपट शाहरुख खान, काजोल आणि रानी मुखर्जी यांच्यातील ट्रँग्युलर लव्ह स्टोरीवर आधारित आहे. चित्रपटातील तिन्ही स्टार्सचं काम लोकांना आवडलं, परंतु सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली छोट्या अंजलीच्या पात्राला. ही भूमिका अभिनेत्री सना सईदन साकारली होती. छोटी अंजली ही सिनेमात राणी मुखर्जीची मुलगी दाखवली गेली होती. चित्रपटात छोट्या अंजलीच्या भूमिकेनं सर्वांचं मन जिंकणारी सना सईद आता मोठी झाली आहे. सिनेमातली ती चिमुकली आता तब्बल 36 वर्षांची झाली आहे. 'कुछ कुछ होता है'ची चिमुकली अंजली, आज भल्याभल्या ग्लॅमरस अभिनेत्रींना मागे टाकते.
View this post on Instagram
'कुछ कुछ होता है' या चित्रपटात निष्पाप दिसणारी सना सईद आता मोठी झाली आहे. सना सईद सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत राहते. सना सईद आता 36 वर्षांची आहे, पण तिला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही, हे फारच खेदजनक आहे. सना सईद करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द ईयरमध्ये दिसलेली. काही चित्रपटांव्यतिरिक्त, ती काही डान्स रिअॅलिटी शोमध्येही दिसली होती, पण तिथेही तिला अपेक्षित यश मिळालं नाही.
दरम्यान, 2023 मध्ये सना सईदनं तिचा लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड सबा वोनरशी लग्न केलं, जो हॉलिवूडचा साउंड डिझायनर आहे आणि लॉस एंजेलिसमध्ये राहतो. सना अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्यासोबतचे फोटो पोस्ट करत असते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Heyy Babyy चित्रपटातील बाळ आता झालंय 21 वर्षांचं, अभिनेत्रीचा फोटो पाहून प्रेमात पडाल























