एक्स्प्लोर

Tamasha Live : आली रे आली 'कडक लक्ष्मी' आली; 'तमाशा लाईव्ह'चे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिचे 'कडक लक्ष्मी' हे गाणे सोशल मीडियावर झळकले आहे.

Tamasha Live : 'तमाशा लाईव्ह' (Tamasha Live) चित्रपटातील गाण्यांना संगीतप्रेमी चांगलाच प्रतिसाद देत आहेत. आता नुकतेच शेफाली अर्थात सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिचे 'कडक लक्ष्मी' हे गाणे सोशल मीडियावर झळकले असून या गाण्याला क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे. तर या गाण्याला पंकज पडघन यांनी संगीत दिले असून विशेष बाब म्हणजे हे गाणे सोनाली कुलकर्णी हिनेच गायले आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे. यात सोनाली कुलकर्णी आक्रमक स्वरूपात तिची व्यथा व्यक्त करत आहे. गाण्याचे नाव 'कडक लक्ष्मी' असून नावाप्रमणेच या गाण्याचे बोल आहेत.

'कडक लक्ष्मी' गाण्याबद्दल गीतकार क्षितीज पटवर्धन म्हणतात, "हे गाणे मी शब्दबद्ध केले असले तरी सोनालीने अगदी उत्तमरित्या ते सादर केले आहे. मुळात हे गाणे ती स्वतः गायली आहे. त्यामुळे या गाण्यातील भावना या तिच्या चेहऱ्यावर आपसुकच दिसून येत आहेत.’’

'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "संगीतातून कथा सांगणारा ‘तमाशा लाईव्ह’ हा पहिला मराठी चित्रपट आहे. संजय जाधव यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून एक आगळावेगळा प्रयोग सादर केला आहे. या गाण्यांना मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहून संजय जाधव यांचा हा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल याची मला खात्री आहे. " 

पाहा गाणं:

प्लॅनेट मराठी, माऊली प्रॉडक्शन, एटीएट पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा तोलमारे, समीर केळकर, अजय उपर्वात सहनिर्मित या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट येत्या 15 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा:

 

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget