एक्स्प्लोर

Tamasha Live : ‘तमाशा लाईव्ह’ मधील ‘वाघ आला’गाणं रिलीज; 15 जुलैला चित्रपट होणार प्रदर्शित

Tamasha Live : 'वाघ आला' चे नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे. या रॅप साँगमधून सचित पाटीलची ‘अश्विन’ ही भूमिका समोर येत आहे.

Tamasha Live : सांगितिक नजाराणा घेऊन ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live) चित्रपट येत्या 15 जुलैपासून प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या गाण्यांनाही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहेत. चित्रपटातील एक जल्लोषमय गाणे झळकले आहे. त्या गाण्याचे बोल ‘वाघ आला’ असे असून या रॅप साँगमधून सचित पाटीलची ‘अश्विन’ ही भूमिका समोर येत आहे. त्याचा डॅशिंग लूक यात दिसत असून सचितने यात एका वृत्तनिवेदकाची भूमिका साकारली आहे. सचितची ही ओळख आपल्याला सिद्धार्थ जाधव करून देत आहे. या गाण्याला महाराष्ट्राचा बुलंद आवाज लाभला आहे. आदर्श शिंदे यांनी हे गाणे गायले असून क्षितीज पटवर्धन यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. तर संगीतकार अमितराज आहेत. 'वाघ आला' चे नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे. 

गाण्याविषयी गीतकार क्षितीज पटवर्धन म्हणतात, “चित्रपटात प्रेक्षकांना गाण्यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. चित्रपटात वेगवेगळ्या धाटणीची गाणी आहेत, त्यातील हे एक गाणं आहे. नवीन प्रयोग करायला नेहमीच मराठी चित्रपटसृष्टी सज्ज असते. गाण्यातून केलेला एक नवा प्रयोग. ही आमची कलाकृती प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल.” तर संगीतकार अमितराज म्हणतात, “आम्ही नेहमीच काही वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतो. प्रत्येक पात्राला साजेल, असे संगीत आवश्यक असल्याने आम्ही खूप विचार करून संगीत दिले आहे. प्रेक्षकांना आमची कलाकृती नक्कीच आवडेल.”

‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “नेहमीच काही तरी हटके करणारे दिग्दर्शक संजय जाधव यांनी या चित्रपटात वेगळं सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. संगीतप्रेमींसाठी ‘तमाशा लाईव्ह’ म्हणजे एक पर्वणी आहे. यातील प्रत्येक गाण्यात काहीतरी प्रयोग करण्यात आला आहे. पहिल्या रोमॅंटिक गाण्याला रसिकांनी पसंती दर्शवल्यानंतर आता हे दुसरे गाणे आपल्या भेटीला आले आहे. आता इतर गाणीही लवकरच संगीतप्रेमींच्या भेटीला येतील. नक्कीच प्रेक्षकांना ही उत्साहाने भरलेली गाणी आवडतील, अशी आशा व्यक्त करतो.” 

प्लॅनेट मराठी व माऊली प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्मित 'तमाशा लाईव्ह'ची कथा मनीष कदम यांनी लिहिली असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Shashank Ketkar On Smit Machchhar Flydubai Cockpit Attack: 'कॉकपीटमध्ये CCTV कॅमेरा का नसतो?'; Flydubai विमानातील भयंकर प्रकारानंतर मराठी अभिनेत्याचा सवाल, नेटकरीही कोड्यात
'कॉकपीटमध्ये CCTV कॅमेरा का नसतो?'; Flydubai विमानातील भयंकर प्रकारानंतर मराठी अभिनेत्याचा सवाल, नेटकरीही कोड्यात
Drishyam 3 Box Office Collection Day 5: 'दृश्यम 3'ची बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई, दिग्गजांना लोळवून ठरला बॉक्स ऑफिस किंग, आतापर्यंतची कमाई किती?
'दृश्यम 3'ची बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई, दिग्गजांना लोळवून ठरला बॉक्स ऑफिस किंग, आतापर्यंतची कमाई किती?
Sunil lahri Warns Indian People El Nino: 'येणारा काळ संकटांनी भरलेला...'; 'रामायण' मालिकेतल्या लक्ष्मणाचा भारतीयांना सावध राहण्याचा इशारा
'येणारा काळ संकटांनी भरलेला...'; 'रामायण' मालिकेतल्या लक्ष्मणाचा भारतीयांना सावध राहण्याचा इशारा
वडिलांच्या चपला घालण्याचा ‘तो’ क्षण अन् मोठं होण्याचा प्रवास; सोनाली बेंद्रेंच्या ‘सोहळा’चा ट्रेलर चर्चेत
वडिलांच्या चपला घालण्याचा ‘तो’ क्षण अन् मोठं होण्याचा प्रवास; सोनाली बेंद्रेंच्या ‘सोहळा’चा ट्रेलर चर्चेत

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
Nagpur Crime News : नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
SIR Protest Maharashtra: महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Embed widget