(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Taimur Ali Khan Birthday: चार वर्षांचा झाला तैमूर अली खान, तैमूरबद्दल 'या' खास गोष्टी नक्की वाचा
Taimur Ali Khan Birthday: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांचा मुलगा तैमूर अली खान सर्वात चर्चित स्टार किड म्हणून ओळखला जातो. आज तैमूरचा वाढदिवस आहे. तैमूर चार वर्षाचा झाला आहे.
Taimur Ali Khan Birthday: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांचा मुलगा तैमूर अली खान सर्वात पॉप्युलर स्टार किड म्हणून ओळखला जातो. आज तैमूरचा वाढदिवस आहे. आज तैमूर चार वर्षाचा झाला आहे. तैमूरच्या सुंदरतेवर, त्यांच्या करामतीवर लाखो फॅन्स फिदा आहेत. लवकरच तैमूर मोठा भाऊ होणार आहे. करिना कपूर दुसऱ्यांदा गर्भवती आहे. मार्च 2021 मध्ये करीना कपूर खान आणि सैफ अली खान आपल्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहेत. या सगळ्यात देखील तैमूर आपल्या खास अंदाजामुळं चर्चेत असतो.
वॉल पेंटिंग आणि लेगो आर्ट लॉकडाऊनमध्ये तैमूर अली खाननं आपले चित्रकलेतील गुण दाखवले. याबाबत करिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो देखील शेअर केले होते. लॉकडाऊनमध्ये तैमूर लेगो आर्ट आणि वॉल पेंटिंग करताना दिसून आला. त्यानं लेगोजच्या मदतीनं एक सुंदर असा गणपती बाप्पा बनवला होता.
View this post on Instagram
गार्डनिंग
पेटिंगच नाही तर तैमूर अली खान गार्डनिंग करताना देखील लॉकडाऊनमध्ये दिसला होता. वडील सैफ अली खानसोबत गार्डनिंग करताना तैमूर दिसलेला. नवीन रोपं भांड्यात कशी लावायची याचे धडे तो वडिलांकडून घेत असतानाचे फोटो व्हायरल झाले होते.
View this post on Instagram
शेतातल्या कामाचे धडे मध्यंतरी वडील सैफसोबत तैमूर शेतात मस्ती करताना दिसला होता. सैफ आणि तैमूर यांचे शेतात मौजमजा करतानाचे फोटो चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर केले होते.
गुड लुकिंग
तैमूर खान स्टार किड म्हणूनच नाही तर आपल्या इम्प्रेसिव स्टाईलमुळं प्रसिद्ध आहे. स्टायलिश कॅजुअलपासून ते सिंपल कुर्ता पायजमा लुक अशा वेगवेगळ्या रुपातले तैमूरचे फोटो सोशल मीडियात आहे. ज्यात तो खूपच सुंदर दिसतो.