TMKOC : मृत्युच्या एक दिवस आधी मुलाजवळ बोलून दाखवली, ‘ही’ होती ‘नट्टू काकां’ची शेवटची इच्छा!
Nattu Kaka : गतवर्षी कॅन्सरशी संघर्ष करत असताना नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक हे जग सोडून गेले. एका मुलाखतीत घनश्याम नायक यांचा मुलगा विकास याने वडिलांच्या शेवटच्या क्षणांबद्दल सांगितले.
Nattu Kaka : टीव्हीवरची लोकप्रिय कॉमेडी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) 2008पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. इतक्या वर्षांत या टीव्ही मालिकेने अनेक चढउतार पाहिले आहेत. आज आम्ही तुम्हाला या टीव्ही मालिकेत 'नट्टू काका'ची (Nattu Kaka) महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता घनश्याम नायक (Ghanshyam Nayak )यांच्याबद्दल सांगणार आहोत. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील 'नट्टू काका' ही व्यक्तिरेखा नेहमीच चर्चेत होती.
गतवर्षी कॅन्सरशी संघर्ष करत असताना नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक हे जग सोडून गेले. एका मुलाखतीत घनश्याम नायक यांचा मुलगा विकास याने वडिलांच्या शेवटच्या क्षणांबद्दल सांगितले. मृत्युच्या अवघ्या एक दिवस आधी घनश्याम यांनी आपल्या मुलाला जवळ बोलवून आपली शेवटची इच्छा सांगितली होती.
‘ही’ होती शेवटची इच्छा
मृत्यूपूर्वी चेहऱ्यावर मेकअप करण्याची त्यांची शेवटची इच्छा होती, असे त्यांचा मुलगा विकासने सांगितले. वडील घनश्याम नायक यांच्या या इच्छेला मान देत त्यांचा मुलगा विकास याने वडिलांच्या शेवटच्या क्षणी एका व्यावसायिक मेकअप आर्टिस्टला घरी बोलावून त्यांचा संपूर्ण मेकअप करून घेतला होता.
मृत्यूपूर्वी वडिलांच्या चेहऱ्यावर एक गाढ शांतता होती, असे विकास सांगतात. मृत्यूच्या एक दिवस आधी त्याच्या वडिलांनी काय सांगितले होते, तेही विकासने या मुलाखतीत सांगितले होते. विकास यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी घनश्यामजी आपण कोण आहोत, हे देखील विसरले होते. वडिलांचे हे बोल ऐकून आता ते इहलोकीच्या यात्रेला निघाले, हे आम्ही समजून गेलो होतो, असे विकास म्हणाले.
हेही वाचा :
- Pawankhind : 'पावनखिंड' ला मिळालेल्या प्रतिसादावर चिन्मय मांडलेकरची भावनिक पोस्ट ; म्हणाला, 'आम्ही धन्य झालो!'
- Gangubai Kathiawadi : कोण आहे 'गंगूबाई काठियावाडी' मधील शांतनु महेश्वरी ? आलियासोबतच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत
- Majhi Tujhi Reshmigath : ‘मैं भी गुलाबी तू है गुलाबी...’, प्रेमाच्या धाग्याने विणली जाणार यश-नेहाची रेशीमगाठ!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha