TMKOC : भिडे मास्तरांच्या लेकीचा ‘जलपरी’ अंदाज, ‘सोनू’च्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
Nidhi Bhanushali : निधी भानुशालीने कर्नाटकातील मुल्की येथील बीचवर सर्फिंग करतानाचे अतिशय किलर फोटो शेअर केले आहेत.
Nidhi Bhanushali : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम अभिनेत्री निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) ही सोशल ‘मीडिया क्वीन’ आहे. या मालिकेत तिने सोनू भिडेची भूमिका साकारली होती. काही वर्षांपूर्वी या मालिकेला अलविदा म्हटल्यानंतरही निधीचे सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढतच आहेत. निधीने आता तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सी-सर्फिंग करताना असे काही फोटो शेअर केले आहेत की, पाहणाऱ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत.
निधीने इन्स्टाग्रामवर सर्फिंग करतानाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. निधी भानुशालीने कर्नाटकातील मुल्की येथील बीचवर सर्फिंग करतानाचे तीन अतिशय किलर फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ती हसताना दिसत आहे, दुसऱ्या फोटोत ती पोहताना दिसत आहे आणि तिसर्या चित्रात ती केस उडवताना दिसत आहे. तिच्या या अदांवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
पाहा फोटो :
निधी भानुशालीबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक बॅकपॅकर पर्यटक देखील आहे. निधी भानुशाली अनेकदा तिच्या प्रवासातील फोटो तिच्या फॉलोअर्ससोबत शेअर करत असते. तिचे स्वतःचे एक YouTube चॅनल देखील आहे, जिथे ती तिच्या फॉलोअर्सना देशभराची सैर घडवते.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेली 14 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. 28 जुलै 2008 रोजी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, बबिता, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तसेच, या मालिकेच्या कथानकाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते.
हेही वाचा :
- RRR song teaser : राम चरण अन् ज्यूनियर एनटीआरसोबत थिरकली आलिया; 'आरआरआर' मधील धमाकेदार गाण्याचा टीझर रिलीज
- Alia Bhatt and Ranbir Kapoor : अखेर मुहूर्त ठरला! आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच घेणार सात फेरे, 'ब्रह्मास्त्र' रिलीज होताच लग्न
- Ranbir Kapoor, Alia Bhatt : रणबीर की आलिया; कोणाकडे संपत्ती जास्त? जाणून घ्या त्यांच्या लग्झरी लाईफस्टाईलबाबत..
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha