T-Series : टाटा कुटुंबाची कहाणी लवकरच रुपेरी पडद्यावर; उलगडणार 200 वर्षांचा इतिहास
आता लवकरच टाटा या समूहाची कहाणी ही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
T-Series : देशातील प्रसिद्ध कुटुंब असणाऱ्या टाटा (TATA) कुटुंबाची कहाणी आता लवकरच रुपेरी पडद्यावर दाखवली जाणार आहे. टाटा समूहाची स्थापना जमशेदजी नसरवानजी टाटा यांनी 1868 मध्ये केली होती आणि तेव्हापासून टाटा समूह देशाच्या विकासात योगदान देत आहे. आता लवकरच या समूहाची कहाणी ही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
भूषण कुमार यांच्या टी सीरिज या प्रोडक्शन कंपनीनं त्यांच्या या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांनी या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली. टी सीरिजनं या प्रोजेक्टसाठी लेखक गिरीश कुबेर यांच्या 2019 मधील "द टाटा: हाऊ अ फॅमिली बिल्ड्स अ बिझनेस अँड अ नेशन" या कादंबरीवर टी-सीरिजच्या या नव्या प्रोजेक्टचे कथानक आधारित असणार आहे. टी- सीरिज आणि Almighty Motion Picture हे या प्रोजेक्टची निर्मिती करणार आहेत.
टी- सीरिजची पोस्ट
टी-सीरिजनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, 'T-Series आणि Almighty Motion Picture हे या उत्तम कुटुंबाची कथा तुमच्या समोर मांडण्यासाठी सज्ज आहेत. ' टी सीरिजच्या या नव्या प्रोजेक्टची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहात आहेत.
View this post on Instagram
चित्रपट का वेब सीरिज?
टी-सीरिजचा हा नवा प्रोजेक्ट एक चित्रपट असणार आहे की वेब सीरिज याबाबत कोणतीही माहिती अजून दिलेली नाही.
गिरीश कुबेर यांच्या "द टाटा: हाऊ अ फॅमिली बिल्ड्स अ बिझनेस अँड अ नेशन" या कादंबरीमध्ये केवळ रतन टाटा यांच्याबद्दलच नाही तर टाटा कुटुंबातील प्रत्येक पिढीची माहिती देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
- Happy Birthday Dilip Joshi : कधीकाळी 50 रुपये मानधन घेणारे दिलीप जोशी आज आहेत कोट्यवधींचे मालक; एका एपिसोडसाठी घेतात एवढे मानधन
- Heropanti 2 : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर टायगर श्रॉफचा 'हीरोपंती 2' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
- BE Rojgaar : तीन बेरोजगारांची गोष्ट; ‘BE Rojgaar’ चा पहिला एपिसोड पाहिलात?