एक्स्प्लोर

Swapnil Joshi : निर्मिती विश्वातलं पदार्पण ते नव्या कोऱ्या गाडीच्या चर्चा , यंदाच्या वर्षात स्वप्नील जोशीसाठी 'या' गोष्टी ठरल्या खास

Swapnil Joshi : नाच गं घुमा, बाई गं , नवरा माझा नवसाचा 2 अश्या धमाकेदार चित्रपटातून स्वप्नीलने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

Swapnil Joshi :  निर्माता- अभिनेता स्वप्नील जोशीसाठी (Swapnil Joshi) यंदाचं हे वर्ष खास ठरलंय. स्वप्नीलने 2024 वर्षाची सुरुवात निर्मिती विश्वात पदार्पण करण्यापासून केली आणि बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्ल चित्रपटाची निर्मिती केली. स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला चित्रपट "नाच गं घुमा" 2024 या वर्षात बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. दुहेरी भूमिका बजावताना अनेक आव्हानं देखील आली पण अभिनय आणि निर्मिती यांची योग्य सांगड घालत स्वप्नील ने हे वर्ष गाजवलं. 

नाच गं घुमा, बाई गं , नवरा माझा नवसाचा 2 अश्या धमाकेदार चित्रपटातून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्याच्या वाळवी या सिनेमाला यंदाच्या वर्षात राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. काम जोरदार झालं पाहिजे असं स्वप्नील नेहमीच म्हणतो आणि म्हणून 2024 वर्ष हे त्याने खऱ्या अर्थाने सुपरहिट केलं आहे. 

स्वप्नीलने चाहत्यांना दिलं डबल सरप्राईज

स्वप्नीलने वर्ष संपत असताना अजून एका निर्मितीची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना डबल सरप्राईज मिळालं आहे.  सुशीला - सुजीत या आगामी चित्रपटात तो निर्माता आणि अभिनेता या दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतीच सुशीला - सुजीत चित्रपटाची रिलीज झाली असून 18 एप्रिल 2025 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्ष संपतय पण स्वप्नीलच्या नव्या प्रोजेक्ट्स ची एका मागोमाग एक यादी मोठी आहे. कारण त्याने वर्ष सरताना पहिल्या वहिल्या गुजराती चित्रपटाची घोषणा केली आहे.  " शुभचिंतक " अस या गुजराती चित्रपटाचं नाव असून येणाऱ्या वर्षात स्वप्नील गुजराती प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.                                         

आगामी वर्षात स्वप्नील 17 जानेवारीला  जिलबी तर 18 एप्रिलला सुशीला - सुजीत हे दोन नवेकोरे चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या वर्षात स्वप्नील अजून कोणकोणत्या प्रोजेक्ट्सचा भाग होणार हे बघण आता उत्सुकतेच ठरणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by स्वप्नील जोशी (@swwapnil_joshi)

ही बातमी वाचा : 

Sai Tamhankar : आव्हानात्मक भूमिका ते बॉलिवूडमध्ये दमदार कामगिरी, 2024 मध्ये सई ताम्हणकरने केल्या 'या' खास गोष्टी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक

व्हिडीओ

Sunil Shelke On NCP : सुनेत्रा वहिनींनी विलीनीकरण करायचं म्हटलं तर माझा पाठिंबा असेल
Dhairyasheel Mohite Patil : खासदार धैर्यशील मोहिते पाटील पोलिसांवर भडकले
Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
Embed widget