Sai Tamhankar : आव्हानात्मक भूमिका ते बॉलिवूडमध्ये दमदार कामगिरी, 2024 मध्ये सई ताम्हणकरने केल्या 'या' खास गोष्टी
Sai Tamhankar : भक्षक, अग्नी हे दोन हिंदी चित्रपट प्रेक्षकांना विशेष आवडले आणि त्याच कौतुक देखील तितकच झालं.
Sai Tamhankar : मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिने सरत्या वर्षात अनेक दमदार भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. वेगवेगळ्या भूमिका आणि अनेक आव्हानात्मक काम करून तिने हे वर्ष खास करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. बॉलिवूडसोबतच सईच्या अभिनयाची जादू मराठीतही पाहायला मिळाली. 2024 वर्षाची सुरुवात तिने "श्री देवी प्रसन्न" चित्रपटाने केली आणि वर्षाचा शेवट तिने धगधगत्या "अग्नी" ने केली आहे.
भक्षक, अग्नी हे दोन हिंदी चित्रपट प्रेक्षकांना विशेष आवडले आणि त्याच कौतुक देखील तितकच झालं. सोबतीला "मानवत मर्डर्स" सारखी कमालीची वेब सीरिज आणि सईचा कधीही न पाहिलेला लूक यातून प्रेक्षकांना अनुभवता आला. 2024 वर्षात सई ने तिच्या कमालीच्या भूमिका साकारत बॉलिवुडला भुरळ घातली आणि बॉलिवुड मध्ये सईच्या कामाचा बोलबाला देखील झाला. अग्नी असो किंवा भक्षक सईने बॉलिवूड मध्ये स्वतःची वेगळी आणि हक्काची जागा निर्माण करतेय आणि येणाऱ्या वर्षात देखील ती अनेक बड्या बॉलिवुड प्रोजेक्ट्सचा महत्त्वपूर्ण भाग होणार आहे.
सईच्या बॉलिवूड प्रोजेक्ट्सची चर्चा
वर्षभरात सईने केलेले सगळेच प्रोजेक्ट्स चर्चेत राहिले आणि याचं कारण देखील तितकच खास आहे असं म्हणायला हरकत नाही . तिने वैविध्यपूर्ण विषयांवर आधारित भूमिका तर केल्या आहेतच. पण तिने वेगवेगळ्या भाषांमध्येही काम केल आहे. तिच्या कामातून वेगळ्या धाटणीच्या भूमिका प्रेक्षकांनी बघितल्या आणि त्याला भरभरून प्रेम देखील दिलं. वर्षभरात तिने अनेक प्रोजेक्ट्सची घोषणा केली यात मुख्यपणे बॉलिवूड प्रोजेक्ट्सचा बोलबाला झाला.
वर्षभरात तिने अनेक प्रोजेक्ट्स ची घोषणा केली यात मुख्यपणे बॉलिवूड प्रोजेक्ट्स चा बोलबाला झाला ! सई येणाऱ्या काळात " डब्बा कार्टेल, मटका किंग " या बॉलिवूड प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार तर मराठीत "गुलकंद, बोल बोल राणी" या चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारताना दिसतेय.वर्ष संपलं तरी सईच काम तितक्याच जोमात सुरू आहे. येणाऱ्या वर्षात सई अजून काय काय भूमिका साकारणार हे बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
View this post on Instagram