एक्स्प्लोर
Sushant Singh Rajput | कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीकडून सुशांतचा गौरव
अत्यंत कमी वयात विविध विषय हाताळलेला कलाकार म्हणून कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीने सुशांतचा गौरव केला आहे. त्याने सिनेमासृष्टीत दिलेलं योगदान आणि त्याची सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन त्याला प्रमाणपत्र देण्यात आलं आहे.
मुंबई : सुशांतसिंह राजपूतने अत्यंत कमी कालावधीत अनेक विविध विषयांचे चित्रपट केले. यात आवर्जून उल्लेख करण्याजोगे काय पो छे, एम.एस धोनी, केदारनाथ, सोनचिडिया आदी सिनेमांचा समावेश होतो. अत्यंत कमी वयात विविध विषय हाताळलेला कलाकार म्हणून कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीने सुशांतचा गौरव केला आहे. त्याने सिनेमासृष्टीत दिलेलं योगदान आणि त्याची सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन त्याला प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. त्याची बहीण श्वेता सिंग किर्ती हिने इन्स्टावर या प्रमाणपत्राचा फोटो टाकून त्यांचे आभार तर मानलेच. शिवाय, कॅलिफोर्निया आमच्यासोबत आहे आणि तुम्ही? असा प्रश्नही विचारला आहे.
सुशांतसिंह राजपूतचा 14 जून रोजी मृत्यू झाला. मुंबई पोलिसांनी त्याची नोंद आत्महत्या अशी केली असली तरी ती आत्महत्या नसून हत्या आहे असा नवा सूर सध्या ऐकू येतो आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात आता नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी यात आता ईडीही उतरलं आहे. एकीकडे बिहार पोलिसांकडे सुशांतच्या कुटुंबियांनी केलेले खुलासे आणि मुंबई पोलिसांना दिलेले जबाब अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर सध्या सुशांतचा तपास चालू आहे. माझ्या घराचे हफ्ते माझ्याच खात्यातून, सुशांतच्या नाही; कागदपत्रांसह अंकिता लोखंडेचा दावा या पार्श्वभूमीवर आजच्या स्वातंत्र्यदिनी सुशांतला कॅलिफोर्नियाने सन्मानित करणं त्याच्या कुटुंबियांसाठी आणि सर्वंच भारतीयांसाठी भावनिक प्रसंग आहे. त्याची माहीती देताना सुशांतच्या बहिणीने तुम्ही आमच्या सोबत आहात का असं विचारणं म्हणजे, पुन्हा या निमित्ताने नव्या वादाला तोंड फोडण्यासारखं आहे. WEB EXCLUSIVE | सुशांतच्या बँक खात्याबाबत ईडीला नवी माहिती, गोकुलम फिल्म्स-रियामधील व्यवहारावर संशय ही पोस्ट करताना श्वेता या सुशांतच्या बहिणीने पुन्हा सीबीआय फॉर सुशांत हा हॅशटॅग वापरला आहे. सुशांतच्या प्रकरणात इडी उतरल्यानंतर रोज नवी प्रकरणं.. खुलासे समोर येऊ लागले आहेत. संबंधित बातम्या SSR Death Case | सुशांतच्या अकाउंटमधून अंकिता लोखंडे हिच्या फ्लॅटचा जात होता EMI
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement