एक्स्प्लोर

गर्दीतून वाट काढत नवरदेवाचा घोडा आला, शेवटच्या अक्षता पडताच एकच जल्लोष; पुरंदरमध्ये गोरज मुहूर्तावर सूरज चव्हाण- संजनाचा विवाह संपन्न

suraj Chavhan: काल सायंकाळी 6 वाजताच्या गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडला. 

Suraj  Chavhan wedding:  बिग बॉस सीजन 5 विजेता सुरज चव्हाण काल 29 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकला. अतिशय थाटामाटात 'झापुक झुपुक' सुरज चव्हाणच्या (Suraj Chavhan) लग्नाचा बार उडाला.  सुरजच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा आहे.  त्याच्या लग्नातील हळद, मेहंदी, प्री-वेडिंग शूट ते अगदी वरातीपर्यंतचे फोटो चाहत्यांनी अक्षरशः उचलून धरले होते.  घोड्यावर नवरदेव म्हणून लग्नमंडपात गुलीगत एन्ट्री घेतलेला सुरज गर्दीतून वाट काढत पुढे गेला. बोहल्यावर चढला आणि उपस्थित असंख्य जवळच्या लोकांनी जल्लोषात त्याचं लग्न लावलं. सुरज चव्हाण आता पुरंदरचा जावई झालाय. पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील संजना गोफणे हिच्याशी त्याचा विवाह पार पडला आहे. पुरंदर तालुक्यातील खळद येथील माऊली गार्डन या मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात सुरज चव्हाणचा विवाह सोहळा पार पाडला. काल सायंकाळी 6 वाजताच्या गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rahul🎥 (@cinematics_by_rahul)

लग्नामध्ये सुरज आणि संजना या दोघांनीही पारंपरिक लूक केला होता. संजनाने निळ्या रंगाची देखणी साडी नेसली होती. सोनेरी रंगाचा शेला, नथ हिरवा चुडा आणि दागिने असा लुक होता. तर सूरजने पांढऱ्या रंगाची जोधपुरी घातली होती. दोघेही लग्नात खूप खुश दिसत होते. सोशल मीडियावर दोघांच्याही लग्नाचे फोटो धुमाकूळ घालत आहेत. बिग बॉस फेम जानवी किल्लेकर करवली म्हणून प्रत्येक विधीमध्ये दिसली. सुरज च्या लग्नात बिग बॉसच्या घरातील धनंजय पोवार, पॅडी , यांच्यासह अनेक राजकीय मान्यवरही सहभागी झाले होते. अनेक इन्फ्लुएन्सर्सने सुरजच्या लग्नात हजेरी लावली होती. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @maharashtra_remix_reel


गेल्या काही दिवसांपासून सुरजच्या लग्नापूर्वीच्या विधी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. संजनाने सुरज च्या गळ्यात वरमाला घालताच त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाले आहेत. भाऊचं करियर पण झाला आणि लग्नही झालं असे कॅप्शन देते चाहत्यांनी कमेंट करत सुरजला शुभेच्छा दिल्या आहेत. सुरज चव्हाण आणि संजना गोफणे या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. संजना ही सुरज च्या चुलत मामाची मुलगी आहे. टिक टॉक वर म्हणून स्टार असलेला सुरज बिग बॉस सीजन 5 च्या मध्ये आला. त्याच्या गुलगत स्टाईल मुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. बिग बॉसचा विजेता झाला आणि महाराष्ट्रभर त्याने नाव कमावलं.

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget