Suraj Chavan Marathi Movie : सूरज चव्हाणच्या सिनेमातलं रोमँटीक गाणं, 'राजा राणी' सिनेमातून जुळणार गावरान प्रेमकथेचे सूर
Suraj Chavan Marathi Movie : सूरज चव्हाणचा 'राजाराणी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमातलं गाणं रिलीज झालं आहे.
Suraj Chavan Marathi Movie : सध्याच युग हे प्रेमयुग म्हणून ओळखलं जातं, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. प्रियकर-प्रेयसी प्रेमाची कबुली देत एका नात्यात अडकतात. या प्रेमीयुगुलांवर आधारित वा त्यांना प्रोत्साहन देणारी अशी अनेक रोमँटिक गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. अनेक प्रेमगीतांनी साऱ्यांच्या मनावर अधिराज्य केलं आणि आता या गाण्यांच्या पाठोपाठ आणखी एका रोमँटीक गाण्याने साऱ्या रसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हे गाणं म्हणजे राजा राणी सिनेमातलं 'थोडासा भाव देना'. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या 'राजा राणी' (Raja Rani) या चित्रपटातील हे रोमँटिक गाणं साऱ्यांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झालं आहे.
'राजा राणी' हा चित्रपट 18 ऑक्टोबर पासून सिनेरसिकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपट येण्यापूर्वीच चित्रपटाच्या गावरान कथानकाने साऱ्यांची उत्सुकता वाढविली आहे. आता या पाठोपाठ चित्रपटातील मुख्य नायक आणि नायिकेभोवती फिरणाऱ्या कथेवरील गाण्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
सूरजच्या पहिल्या सिनेमातलं गाणं
प्रेयसीला मनवण्यासाठी प्रियकराचं अतोनात प्रेम या गाण्यातून पाहायला मिळतंय. या गाण्यात रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे यांचा रोमँटिक अंदाज विशेष भावतोय. तर या गाण्यात आपल्या मित्राला पाठिंबा देताना 'बिग बॉस' फेम सूरज चव्हाण आणि तानाजी गलगुंडे दिसतोय.
'राजा राणी' चित्रपटातील 'थोडासा भाव देना' या गाण्याच्या संगीताची जबाबदारी पी. शंकरम यांनी तर पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे यांनी सांभाळली आहे. तर या सुंदर अशा गाण्याला हर्षवर्धन वावरे याने त्याच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केलं आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे तर या गाण्याचे बोल गोवर्धन दोलताडे व दौलत जाधव यांनी लिहिले आहेत. येत्या 18 ऑक्टोबर 2024 पासून हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस येणार असून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित येणार आहे.
View this post on Instagram