एक्स्प्लोर

Supriya Pilgaonkar : अवघ्या 18 वर्षी लग्न, सबनीस ते पिळगांवकर होतानाचा 'तो' दिवस; सुप्रिया पिळगांवकर म्हणाल्या...

Supriya Pilgaonkar - Sachin Pilgaonkar : सचिन पिळगांवकरांसोबत लग्न करतानाचा तो दिवस कसा होता याविषयी सुप्रिया पिळगांवकर व्यक्त झाल्या आहेत. 

Supriya Pilgaonkar - Sachin Pilgaonkar :  सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) यांनी वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर सचिन-सुप्रिया ही जोडी देखील महाराष्ट्राच्या पसंतीस उतरली. जवळपास या जोडीने आता 40 वर्षांचा संसार केलाय. अनेक चढ-उतार, आनंदाचे क्षण या जोडीने एकत्र साजरे केलेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजनही केलंय. 

सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. त्यामध्ये या दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या आठवणी शेअर केल्या आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा लग्न होणार होतं, त्या दिवशी मी खूप रडले होते, तो दिवस माझ्यासाठी भयंकर होता, असा खुलासा देखील सुप्रिया पिळगांवकर यांनी केला आहे. 

तो दिवस माझ्यासाठी भयंकर - सुप्रिया पिळगांवकर

सुप्रिया पिळगांवकर यांनी त्यांच्या लग्नाच्या आठवणी शेअर करताना म्हटलं की, 'सबनीसांची पिळगांवकर होतानाचा तो दिवस मला चांगलाच आठवतोय. कारण सगळं झाल्यानंतर मला जेव्हा जाणीव झाली की आता आईबाबांना सोडून जायचंय. तो दिवस खूप कठिण होता माझ्यासाठी, खूप रडले होते मी तेव्हा. तो दिवस खूपच भयंकर होता, कारण काय करतोय, कुठे जातोय असं सगळंच मला आठवत होतं. कारण माझं वय अगदीच हे 18 वर्ष वैगरे होतं.  त्यावर सचिन पिळगांवकरांनी म्हटलं की, तिच्या आईवडिलांपेक्षा जास्त दिवस तिने माझ्यासोबत काढली आहेत.' 

'मला मराठी मुलीशीच लग्न करायचं होतं...'

'ती मला पहिल्यांदाच आवडली होती. पण हिच्याशीच आपण लग्न करायला हवं, हे मी तिच्या आईवडिलांना भेटून ठरवलं. कारण त्या दोघांनी तिच्यावर केलेले संस्कार, ते दोघेही किती सुसंकृत आहेत, हे मला त्यांना भेटल्यानंतर कळलं. मला माझ्या आयुष्यातली जोडीदार ही अतिशय संस्कारी हवी होती. मी आधीपासूनच ठरवलं होतं की, मी मराठी मुलीशीच लग्न करणार. त्यामध्ये अरेंज मॅरेज करायचं नाही आणि मराठी मुलीशीच लग्न करायचं या दोन गोष्टींवर मी ठाम होतो', असं सचिन पिळगांवकर यांनी म्हटलं. 

'या गोष्टीचा मला खूप अभिमान'

संसाराला 40 वर्ष झाली तरीही आज तुम्हाला सचिन पिळगांवकरची बायको म्हणून ओळखतात या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता. त्यावर सुप्रिया पिळगांवकर यांनी म्हटलं की, 'तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मला कधी सुप्रिया अशी हाक ऐकूच आली नाही. ती हाक नेहमीच सचिनची बायको अशीच हाक ऐकू आली आहे. मी मराठीत सुद्धा एवढं काम केलं आहे पण तरीही माझी ओळख ही सचिनची बायको अशीच आहे आणि याचा मला खूप अभिमान आहे. उलट मला खूप कौतुक आहे, या गोष्टीचं की ते मला सचिनची बायको म्हणूनच ओळखतात. इथे मला काही माझी वेगळी ओळख असं मला अजिबात वाटत नाही.' 

ही बातमी वाचा : 

'आजही मला सचिनची बायको म्हणूनच...', जया 'अमिताभ' बच्चन वादंगानंतर सुप्रिया पिळगांवकरांचं वक्तव्य चर्चेत 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Arrest Breaking : गेले अनेक दिवस फरार असलेला प्रशांत कोरटकर तेलंगणात सापडला?Eknath Shinde And Aaditya Thackeray Meet : एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आमनेसामने; नेमकं काय घडलं?Shivsainik Bail granted On Kunal Kamraकुणाल कामराच्या सेटची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मंजूरYogesh Kadam On Kunal Kamra CDR : कुणाल कामराला कुणी पैसे दिलेत का? हे तपासणार : योगेश कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
Kunal Kamra : कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
Embed widget