एक्स्प्लोर

Sunny Deol Angry On Paparazzi: 'लाज वाटायला हवी...', घराबाहेर उभ्या असलेल्या पॅपाराझींवर सनी देओल भडकला; आधी हात जोडले मग, सुनव सुनव सुनवलं

Sunny Deol Angry On Paparazzi: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या घराबाहेर पॅपाराझी आणि चाहते जमले आहेत. गुरुवारी सकाळी अभिनेता सनी देओल त्यांचे वडील धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी पोहोचला, तेव्हा तो पपाराझींवर संतापला.

Sunny Deol Angry On Paparazzi: हिंदी सिनेसृष्टीतील (Hindi Movies) ज्येष्ठ अभिनेते (Actor) धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती सध्या नाजूक आहे. तब्बल बारा दिवस उपचार घेतल्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Dharmendra Discharged From Hospital) देण्यात आला. सध्या धर्मेंद्र यांच्यावर त्यांच्या मुंबईतील (Mumbai News) घरीच उपचार सुरू आहेत. त्यानंतर, डॉक्टरांनी आणि सनी देओलच्या टीमनं त्यांच्यावर घरीच उपचार केले जातील, अशी घोषणा केली. अशातच ते घरी परतल्यानंतर, अभिनेत्याची पत्नी हेमा मालिनी, मुलगी ईशा देओल, अभिनेते अमिताभ बच्चन आणि इतर अनेक सिनेस्टार आणि चित्रपट निर्माते त्यांना भेटण्यासाठी घरी आलेले. पण, त्यांना भेटून जाणाऱ्या प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर एक चिंता दिसत होती. त्यामुळे धर्मेंद्र यांचे चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या तब्येतीबाबत जाणून घेण्यासाठी अधीर झाले आहेत. तसेच, अनेक चाहत्यांनी धर्मेंद्र यांच्या घराबाहेर गर्दी केली आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या मोठा लेक सनी देओलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये सनी पाजी फारच चिडलेला दिसतोय. 

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या घराबाहेर पॅपाराझी आणि चाहते जमले आहेत. गुरुवारी सकाळी अभिनेता सनी देओल त्यांचे वडील धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी पोहोचला, तेव्हा तो पपाराझींवर संतापला. गेल्या काही काळापासून देओल कुटुंब आणि टीम वारंवार माध्यमांना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करत आहेत. तरीसुद्धा पॅपाराझी देओल कुटुंबीयांच्या आजूबाजूला वावरत आहेत. तसेच, धर्मेंद्र यांच्या जुहूमधील घराबाहेरही माध्यमांची मोठी गर्दी आहे. अशातच सनी देओल घराबाहेर स्पॉट झाला आणि त्याचवेळी समोर असलेल्या पॅपाराझींवर चिडला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पॅप्सवर संतापला सनी देओल

सोशल मीडियावर सनी देओलचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये सनी देओलच्या चेहऱ्यावरची चिंता, दुःख स्पष्टपणे दिसतंय. तो मान खाली करून त्याच्या घराकडे चालत जातोय. त्यानंतर, एक पॅपाराझी ओरडतो, "हा सनी देओल आहे..." त्यावेळी मात्र, चिंतेत दिसणारा सनी देओल चिडतो आणि त्याचा संयम सुटतो. सर्वात आधी सनी देओल पॅपाराझींसमोर उभा राहून हात जोडतो आणि चिडून पॅपाराझींना फटकारतो. 

सनी देओल व्हिडीओमध्ये म्हणतोय की, "तुम्हाला लाज वाटत नाही का? तुमच्या घरी आई-वडील आणि मुलं आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी असे व्हिडीओ बनवताय आणि पाठवताय... तुम्हाला लाज वाटली पाहिजे..." हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. सनी देओलचा राग स्पष्टपणे दिसून येतोय. 

"आता सर्वकाही देवाच्याच हातात... प्रार्थना करा..."; हेमा मालिनींनी धरम पाजींच्या प्रकृतीबाबत सगळंच सांगितलं

यापूर्वी हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांनी हेल्थ अपडेट दिलीय. त्या म्हणालेल्या की, "हा माझ्यासाठी खूपच कठीण काळ आहे... धरमजींची तब्येत आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. त्यांची मुलं रात्री झोपू शकत नाहीत... सध्या मी अजिबात खचून जाऊ शकत नाही, खूप जबाबदाऱ्या आहेत, पण हो... ते घरी परतल्याचा मला आनंद आहे. ते रुग्णालयातून बाहेर पडले आणि घरी परत आले, याचा आम्हाला दिलासा आहे. त्यांना त्यांच्या लोकांमध्ये राहण्याची गरज आहे. बाकी सर्व काही देवाच्या हातात आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dharmendra Health Update: 'आता सगळं काही देवाच्या हातात, प्रार्थना करा...'; धरम पाजींच्या प्रकृतीबाबत हेमा मालिनींनी सगळं सांगितलं, चाहत्यांची चिंता वाढली

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget