एक्स्प्लोर

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या खरंच अंगात आलं होतं? 'माता की चौकी' कार्यक्रमात नेमकं काय घडलं? अखेर सत्य समोर

Sudha Chandran Responds to Trolls: सुधा चंद्रन यांच्या घरातील माता की चौकी कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर त्यांची थेट प्रतिक्रिया.

Sudha Chandran Responds to Trolls: बॉलिवूड अभिनेत्री सुधा चंद्रन अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. अभिनेत्री खास अभिनय आणि नृत्यासाठी प्रचलित आहे. परंतु, एका व्हायरल व्हिडिओमुळे त्या प्रकाशझोतात आल्या आहेत. त्यांचा एक देवीच्या पुजेच्या दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुधा चंद्रन यांच्या घरात 'माता की चौकी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमात भक्ती गीते  सुरू असतानाच त्यांच्या अंगात आलं. काहींनी अभिनेत्रीच्या अंगात आलं असल्याचं सांगितलं. त्यांना सावरणं  अनेकांना कठीण जात होतं.  या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.  या व्हिडिओची काही नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली. तर, काहींनी त्यांना ट्रोल केलं. पण हा व्हिडिओ व्हायरल होताच सुधा चंद्रन यांनी नुकतंच स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी नेटकऱ्यांनी उडवलेल्या खिल्लीवर प्रत्युत्तर दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी सुधा चंद्रन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या व्हिडिओत सुधा चंद्रन यांच्या अंगात आल्याचं स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. दरम्यान, नेटकऱ्यांनी सुधा चंद्रन यांची खिल्ली उडवली. यावर सुधा चंद्रन यांनी प्रतिक्रिया दिली.  सुधा म्हणाल्या की, "स्वत:बाबत कुणालाही कोणतेही स्पष्टीकरण देणे गरजेचं वाटत नाही. याची मुळात गरजच  वाटत नाही", अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.  

झुमला दिलेल्या मुलाखतीत सुधा चंद्रन म्हणाल्या की, "जीवनाबद्दल माझा एक स्वत:चा दृष्टिकोन आहे.  माझे असे काही संबंध आहेत, ज्यांचा मी आदर करते. मला खरंतर लोकांशी काहीही घेणंदेणं नाही. जे माझी थट्टा करतात,  ते ठीक आहे.  त्यांनी त्यांच्या आयुष्यात आनंदात राहावे. जे लोक प्रश्न विचारतात त्यांना उत्तर देण्यात मी बांधील नाही, आतापर्यंतचे जीवन आनंदाने, आदराने आणि देवाच्या आशीर्वादाने जगले आहे. लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, याचा मी कधीही विचार केलेला नाही. अपघात झाल्यानंतर मला बरेच जण खूप काही बोलले. पण पदरी यश पडल्यानंतर तेव्हा लोक त्यावर बोलतात".

सुधा चंद्रन यांच्या अंगात देवी आली होती

अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या घरात 'माता की चौकी ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भक्तिगीत सुरू  होते. अचानक अभिनेत्रीच्या अंगात देवी येते. अचानक त्या बेशुद्ध पडल्या.  अनेकांनी त्यावेळी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. अंगात देवी येण्यापूर्वी त्यांनी भजन गायले होते. तसेच नृत्य देखील सादर केले होते.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Adinath Kothare: 4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Embed widget