Subodh Bhave In Sant Tukaram Bollywood Movie: सुबोध भावेंची बॉलिवूडमध्ये वर्णी; रुपेरी पडद्यावर साकारणार मराठमोळी भूमिका, सिनेमाचं नावंही ठरलं!
Subodh Bhave In Sant Tukaram Bollywood Movie: 'संत तुकाराम' हा चित्रपट 18 जुलै 2025 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अशा माणसाची कहाणी सांगेल, ज्याचं मौन बंडापेक्षा अधिक शक्तिशाली होतं आणि ज्याची कविता सत्याचा आवाज बनली.

Subodh Bhave In Sant Tukaram Bollywood Movie: आदित्य ओम यांचा भव्य प्रस्तुती असलेला 'संत तुकाराम' (Sant Tukaram), कर्झन फिल्म्ससह, सुबोध भावे यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 18 जुलै 2025 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.'संत तुकाराम' हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील आध्यात्मिक कथांना एक नवीन आयाम देणार आहे. कर्झन फिल्म्स आणि पुरुषोत्तम स्टुडिओज यांच्या सहकार्यानं बनवलेला हा चित्रपट आदित्य ओम यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. 17व्या शतकातील महान मराठी संत-कवी संत तुकाराम यांच्या जीवनावर, विचारसरणीवर आणि भक्ती चळवळीवर आधारित हा चित्रपट आहे.
भव्यदिव्य अशा या चित्रपटात इतिहासाची सत्यता, उत्कृष्ट सिनेकला आणि एक उत्तम नाट्य अनुभव पाहायला मिळेल. या चित्रपटात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे संत तुकारामांची भूमिका साकारत आहेत. सुबोध भावे त्यांच्या खोल आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखले जातात. या चित्रपटात ते तुकारामांच्या आयुष्यातलं दुःख, संघर्ष आणि दैवी चेतना पडद्यावर जिवंत करतील.
'संत तुकाराम' हा चित्रपट 18 जुलै 2025 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अशा माणसाची कहाणी सांगेल, ज्याचं मौन बंडापेक्षा अधिक शक्तिशाली होतं आणि ज्याची कविता सत्याचा आवाज बनली. चित्रपटाची कथा 17 व्या शतकातील महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे, जिथे तुकाराम त्यांच्या वैयक्तिक दुःखातून उठून त्यांच्या भक्तीमय 'अभंग' कवितांद्वारे समाजातील शोषितांचा आवाज बनतात.
या चित्रपटात शिव सूर्यवंशी, शीना चौहान, संजय मिश्रा, अरुण गोविल, शिशिर शर्मा, हेमंत पांडे, गणेश यादव, ललित तिवारी, मुकेश भट्ट, गौरी शंकर, ट्विंकल कपूर, रूपाली जाधव आणि डीजे अकबर सामी असे दिग्गज कलाकार आहेत. ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना या चित्रपटात सूत्रधरची भूमिका साकारत आहेत. जो आपल्या शक्तिशाली आवाजानं चित्रपटाला आध्यात्मिक खोली आणि संदर्भ देईल.
चित्रपटाचं संगीत निखिल कामत, रवी त्रिपाठी आणि विरल-लवण यांनी दिलं आहे, जे अभंग परंपरेसह शास्त्रीय आणि लोकसंगीताचं सुंदर मिश्रण असेल. प्रत्येक गाणं संत तुकारामांची भक्ती, वेदना आणि संघर्ष प्रेक्षकांपर्यंत पोहोचवेल.
बी. गौतमच्या कर्झन फिल्म्स आणि पुरुषोत्तम स्टुडिओज निर्मित, हा चित्रपट संपूर्ण भारतीय प्रेक्षकांना लक्षात घेऊन बनवण्यात आला आहे, जेणेकरून तो प्रत्येक भाषा, प्रदेश आणि धर्माच्या लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचेल.
























