एक्स्प्लोर

ड्रग्स प्रकरणात रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्ज फेटाळला

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्स कनेक्शन उघड झाल्यानंतर काल चौकशीनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे.त्यानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोर्टात दाखल करण्यात आलं. तिथं कोर्टानं तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मुंबई: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्स कनेक्शन उघड झाल्यानंतर काल अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोर्टात दाखल करण्यात आलं. तिथं कोर्टानं तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तिच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज देखील दाखल केला मात्र खूप वेळ चाललेल्या सुनावणीनंतर जामीन अर्ज फेटाळण्यात आला. याचा अर्थ असा की आता रियाला जेलमध्ये जावंच लागणार आहे.

काल अटकेनंतर रियाची सायन हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्ट केली गेली. यानंतर तिला NCB च्या ऑफिसमध्ये आणलं गेलं. तिथं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाने चौकशीदरम्यान ड्र्ग्स घेतल्याचं कबूल केलं आहे. सुशांत आणि त्याच्या मित्रांसोबत अनेकदा ड्रग्स घेतल्याचंही तिने मान्य केलं आहे. रियाला आज भायखळा जेलमध्ये घेऊन जातील. तर आज तिचे वकील सतिश मानेशिंदे सेशन कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती आहे.

पुरावे मिळाल्यानंतर रियाला काल अटक करण्यात आली आहे. रियाचे ड्रग्स माफियांसोबत संबंध असल्याचंही उघड झालं आहे. रिया सराईत गुन्हेगार नसल्याने तिला रिमांडची गरज नाही. मात्र वेळोवेळी तिला चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे, असं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी म्हटलं आहे.

Rhea Chakraborty Arrested: ड्रग्स कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक

रियाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले जाईल. एनसीबीने रियाची रविवारी सहा तास आणि सोमवारी आठ तास चौकशी केली. यावेळी एनसीबीने रिचा धाकटा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि सुशांतचा वैयक्तिक कर्मचारी दीपेश सावंत यांची समोरसमोर चौकशी केली.

विशेष म्हणजे, NCB ने मोबाइल चॅट रेकॉर्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक डेटा प्राप्त केला होता, ज्यामध्ये हे लोक बंदी घातलेल्या ड्रग्सची खरेदी करत असल्याचं समोर आलं होतं. गेल्या काही दिवसांतील या प्रकरणाच्या तपासादरम्यान एनसीबीने या तिघांना अटक केली आहे.

Rhea Chakraborty Arrested: रिया चक्रवर्ती दोषी आढळल्यास किती वर्ष शिक्षा होऊ शकते?

यापूर्वी अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयमार्फत रियाची चौकशी करण्यात आली होती. रियाने बर्‍याच मुलाखतींमध्ये सांगितले होते की तिने स्वत: कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही. सुशांतसिंह राजपूत गांजा खायचा असा दावा तिने केला होता.

मात्र आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाने कबूल केले की तिने ड्रग्स सेवन केले आहे. एनसीबीने अंजू केशवानी नावाच्या व्यक्तीलाही अटक केली. कैजन इब्राहिमच्या चौकशीदरम्यान केशवानीचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणात कैजनलाही अटक करण्यात आली होती.

एनसीबीने आतापर्यंत या प्रकरणात नऊ जणांना अटक केली आहे. त्यातील सात जण या तपासाशी थेट संबंधित आहेत तर एनडीपीएस कायद्यातील कलमांतर्गत चौकशी सुरू झाल्यानंतर दोघांना अटक केली गेली. अभिनेता सुशांतसिंग राजपूत 14 जून रोजी वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget