आमदाराची लेक हिरोईन बनली, पण तिच्यामुळे दोन सुपरस्टार भावांमध्ये हाडवैर निर्माण झालं, 18 वर्षांपासून दोघांमध्ये अबोला
south cinema : एका बॉलिवूड अभिनेत्रीमुळे हे दोन्ही सुपरस्टार गेल्या 18 वर्षांपासून एकमेकांशी बोललेले नाहीत. चला जाणून घेऊया ते कोण आहेत आणि त्यांची कहाणी काय आहे?

south cinema : भारतीय सिनेमातील खासकरुन दाक्षिणात्य दोन सुपरस्टार अभिनेते नातेवाईक देखील आहेत. ते लहानपणापासून एकाच घरात वाढले, एकत्र खेळले. आज दोघेही इंडस्ट्रीतील नामांकित स्टार म्हणून ओळखले जातात. हे अभिनेते दुसरे तिसरे कोणी नसून अल्लू अर्जुन आणि राम चरण आहेत. मात्र, कधीकाळी एका बॉलिवूड अभिनेत्रीवरून त्यांच्यात वाद झाला होता, अशी चर्चा आहे. या वादामुळे गेल्या 18 वर्षांपासून त्यांनी एकमेकांशी बोलणे बंद केले, अशा अफवा सोशल मीडियावर वाचायला मिळत आहेत. चला, त्यामागची गोष्ट जाणून घेऊया.

अभिनेता अल्लू अर्जुनच्या सुरुवातीच्या काळात त्याने एका अभिनेत्रीवर प्रेम केलं होतं, अशी चर्चा होती. त्या अभिनेत्रीचं नाव होतं नेहा शर्मा. 2007 मध्ये आलेल्या चिरुथा या चित्रपटातून तिने तेलुगू सिनेमात पदार्पण केलं. त्यानंतर ती क्रूक या बॉलिवूड चित्रपटातून लोकप्रिय झाली. त्याच काळात नेहा आणि अल्लू अर्जुन एकमेकांच्या प्रेमात होते, अशा बातम्या समोर आल्या. इतकंच नव्हे, तर अर्जुन तिला लग्नासाठी विचार करत होता, अशीही कुजबुज होती.

नेहा शर्मा हिने चिरुथा चित्रपटात राम चरणसोबत मुख्य भूमिका केली होती. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच राम चरण आणि नेहा यांच्यात प्रेमसंबंध जुळल्याची चर्चा होती. इतकेच नव्हे, तर दोघांनी गुपचूप लग्न केलं आणि हनीमूनलाही गेले, अशा अफवाही पसरल्या.

या बातम्यांनी अल्लू अर्जुन खूप व्यथित झाला. जिच्याशी तो लग्न करू इच्छित होता, तीच त्याच्या नातेवाईक राम चरणवर प्रेम करते, हे समजल्यावर तो खूप दुखावला, अशा चर्चा पसरल्या. या एका घटनेमुळे राम चरण आणि अल्लू अर्जुन यांच्यात दुरावा निर्माण झाला, असं म्हटलं जातं. चिरुथाच्या रिलीज नंतर गेल्या 18 वर्षांपासून त्यांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं, अशीही चर्चा आहे. या अफवांवर राम चरणने एका टेलिव्हिजन शोमध्ये खुलेपणाने प्रतिक्रिया दिली. त्याने नेहा शर्मासोबत लग्न झाल्याच्या बातमीचं खंडन केलं.

राम चरण म्हणाला की अशा बातम्यांमुळे त्याची पत्नी उपासना यांच्यासोबत गैरसमज निर्माण होऊ शकतो. त्याने स्वतःविषयी आणि नेहा शर्माविषयी पसरलेल्या बातम्या खोट्या असल्याचं स्पष्ट केलं.
दरम्यान, 2012 मध्ये राम चरणने उपासनाशी लग्न केलं. दुसरीकडे, अल्लू अर्जुनने 2011 मध्ये स्नेहा रेड्डीवर प्रेम करून लग्न केलं. त्यांना दोन मुले आहेत. मात्र, आजही राम चरण आणि अल्लू अर्जुन फारसं बोलत नाहीत आणि कोणत्याही कार्यक्रमाला एकत्र हजेरी लावत नाहीत, असं म्हटलं जातं. तथापि, अल्लू अर्जुन आणि राम चरण यांच्या दुराव्यासाठी नेहा शर्मा जबाबदार आहे, याचा कोणताही पुरावा नाही. तसेच, त्यांच्यातील न बोलण्याचं नेमकं कारणदेखील स्पष्ट झालेलं नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या























