एक्स्प्लोर

Naga Chaitanya Porsche Car :  नागार्जुनच्या मुलाने खरेदी केली आलिशान पोर्शे कार, कोट्यवधींची किंमत असणारी गाडी पुन्हा एकदा चर्चेत

Naga Chaitanya Porsche Car :  साऊथचा सुपरस्टार आणि नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यने नवीन पोर्श 911 कार खरेदी केली आहे. या पोर्शे कारसोबतचे त्याने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Naga Chaitanya Porsche Car :  लक्झरी जर्मन स्पोर्ट्स कार कंपनी पोर्शे (Porsche Car) सध्या बरीच चर्चेत आहे. पुण्यात याच पोर्शे कारने निष्पाप दोघांचा जीव घेतला. वेदांत अग्रवाल या अल्पवयीन धनिकपुत्राने दारु पिऊन भरधाव वेगात ही गाडी चालवली. त्यावेळी गाडीवरचा त्याचा कंट्रोल गेला आणि त्याने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, साऊथचा सुपरस्टार आणि नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य (Naga Chaitanya) यानेही नवीन पोर्शे कार खरेदी केली आहे. त्याच्याकडे फरारीपासून   बीएमडब्ल्यूपर्यंतच्या अनेक आलिशान गाड्या आहेत. त्यातच आता त्याच्या गाड्यांच्या ताफ्यात सिल्व्हर पोर्शे 911 GT3 RS दाखल झाली आहे. 
नागा चैतन्यने त्याच्या या नव्या गाडीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रिपोर्टनुसार, Porsche 911 GT3 RS ची भारतात एक्स-शोरूम किंमत 3.51 कोटी रुपये आहे.  नागा चैतन्यने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये ही नवी गाडी दाखवली आहे. त्याचप्रमाणे चेन्नईतील पोर्शेच्या कारच्या डीलरशिपनेही त्याचे आणि कारचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, पोर्शे कुटुंबात नागा चैतन्य यांचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. 

हैदराबादची पहिलीच कार

दुसऱ्या रिपोर्टनुसार, या कारची नोंदणी 17 मे 2024 रोजी करण्यात आली आहे. नागा चैतन्यची ही कार हैदराबादची पहिली Porsche 911 GT3RS असल्याचेही सांगितले जात आहे. नागा चैतन्य त्याच्या नवीन कारमध्ये शहरात फिरत असल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Porsche Centre Chennai (@porschecentrechennai)

नागा चैतन्यकडे आलिशान गाड्यांचा ताफा

नागा चैतन्यला लक्झरी कारची खूप आवड आहे. त्याच्या ताफ्यात लाल फेरारी आणि काळी रेंज रोव्हर डिफेंडर 110 यांचा समावेश आहे. नागा चैतन्यच्या मालकीच्या फेरारी 488GTB ची किंमत 3.88 कोटी रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे BMW 740 Li ही गाडी आहे, ज्याची किंमत 1.30 कोटी रुपये आहे. नागाकडे 1.18 कोटी रुपयांची 2X लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग आणि 2.12 कोटी रुपयांची निसान जीटी-आर देखील आहे. याशिवाय त्यांच्या ताफ्यात 2.28 कोटी रुपयांची मर्सिडीज बेंझ जी-क्लास जी 63 एएमजी, 35 लाख रुपयांची एमव्ही ऑगस्टा एफ4 आहे.

नागा चैतन्य 'थंडेल'मध्ये सई पल्लवीसोबत दिसणार

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, 2022 मध्ये, नागा चैतन्यने आमिर खान, करीना कपूर आणि मोना सिंग यांच्यासोबत 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. वेंकट प्रभूच्या ॲक्शन-थ्रिलर 'कस्टडी'मध्ये तो शेवटचा पडद्यावर दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. त्याच्यासोबत अरविंद स्वामी, क्रिती शेट्टी, प्रियमणी, आर सरथकुमार आणि संपत राज देखील होते. नागा चैतन्यचा पुढचा चित्रपट चंदू मोंडेटीच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला 'थंडेल' आहे, ज्यामध्ये तो सई पल्लवीसोबत दिसणार आहे.

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Season 5 update : रितेश भाऊ सांभाळणार बिग बॉस 5ची धुरा, प्रोमो आऊट होताच जेनिलिया वहिनींची प्रतिक्रिया, म्हणाल्या, 'आता वाट...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget