एक्स्प्लोर

सोनू निगमच्या आवाजात मराठमोळी मेजवामनी; सुमधुर सुरांनी सजलेलं 'चंद्रिका'प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi Song Chandrika: सुबोध भावे दिग्दर्शित आणि शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेला, आगामी मराठी चित्रपट 'संगीत मानापमान' या चित्रपटातलं गाणं 'चंद्रिका' सोनू निगम यांनी आपल्या सुमधूर आवाजानं गायलं आहे, जे आज प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.  

Sonu Nigam Marathi Song Chandrika: सोनू निगमनं आपल्या आवाजानं अनेकांच्या काळजाचा ठाव घेतला आहे. आजही सोनू आपल्या गाण्यांनी अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. सोनू निगमच्या आवाजाची जादू प्रत्येकाच्या मनावर होते. अनेक भाषांमधून सोनू निगमनं पार्श्वगायन केलं आहे. आतापर्यंत सोनू निगमनं भरपूर गाण्यांना आपला आवाज दिला आहे. पण यंदा नव्या वर्षाची सुरुवात सोनू निगमनं एका मराठमोळ्या गाण्यानं केली आहे. सुबोध भावे दिग्दर्शित आणि शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेला, आगामी मराठी चित्रपट 'संगीत मानापमान' या चित्रपटातलं गाणं 'चंद्रिका' सोनू निगम यांनी आपल्या सुमधूर आवाजानं गायलं आहे, जे आज प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.  

गायक सोनू निगमनं पहिल्यांदाच अशा प्रकारचं गाणं एका मराठी सिनेमासाठी गायलं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. 'चंद्रिका' या गाण्याविषयी बोलताना सोनू निगम म्हणाला की, 'असं गाणं मी कदाचित आतापर्यंत कोणत्याही चित्रपटासाठी गायलं नसेल, हे गाणं खूपच वेगळं आहे, हे गाणं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा एका मंदिराचं वातावरण तयार झालं, पण हे एक डिव्होशनला सॉन्ग नसून प्रेमाचं गीत आहे. प्रेमामध्ये देखील भक्ती आहे, मी या गाण्यासाठी कुठलाही स्वार्थ न ठेवता स्वतःला पूर्णपणे समर्पण केलं आहे. देवाचे आभार आहेत की मला अशा प्रकारचं गाणं गायला मिळालं.

जितकं सुरेख हे गाणं ऐकायला आहे, तितकंच सुरेख चित्रीकरण या गाण्याचं झालं आहे. सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी या दोन कलाकारांवर हे गाणं चित्रीत केलं गेलं आहे. आणि त्यात सोनू निगमच्या आवाजाची जादू तर जणू काही स्वर्गच. 

सोनू निगम यांनी नाट्य संगीताबद्दल माहिती देताना सांगितलं की, "मी संगीताच्या शैलीशी संबंधित आहे, म्हणूनच मी जगात शक्य तितकं संगीत शिकण्याचा प्रयत्न करतो, मला माझ्या लहानपणी शास्त्रीय संगीत शिकता आलं नाही. त्यामुळे जितकं होईल तितकं शिकून मी प्रेक्षकांसाठी गातो. मी भारतातील अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत, लोकांचा विश्वास आहे की, मी गाऊ शकतो, त्यामुळे मला प्रत्येक भाषा समजून घेण्याची संधी मिळाली. स्वर्गीय लता मंगेशकर जी आणि आशा जी या महान गीतकार आहेत, तर अजय-अतुल हे सुद्धा उत्तम संगीतकार आहेत, त्या सर्वांना नाट्यसंगीताची खूप खोलवर माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याकाढून शिकण्यासारखं खूप काही आहे."

इतकंच नव्हे तर मराठी संगीत आणि मराठी गायक या विषयीसुद्धा सोनू निगम यांनी आपला मत मांडत त्यांचा आवडता मराठी गायक कोण? याची माहिती दिली. ते म्हणाले की, "मराठी गाण्यांमध्ये खूप शोध आहे, जो कोणी संगीतकार किंवा गायक सुराला शोधून काढतो फक्त तोच एक लेजेंड बनू शकतो. मराठी संगीत तर आहेच पण त्याबरोबर मराठी लेखन हे ही एक वेगळं विश्व आहे. मराठी गायकांबद्दल सांगितलं तर बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर हे सगळे उत्तम गायक आहेत. पण तरुणांमध्ये मला आर्या आंबेकरचा आवाज खूप आवडतो, तिने चंद्रमुखी मध्ये खूप सुरेख गायलं आहे. इतर सुद्धा अनेक मराठी गायक आहेत ज्यांचा आवाज मला खूप आवडतो.'

यावेळी बोलताना सोनू निगम यांनी 'संगीत मानापमान' या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता सुबोध भावे यांचं कौतुक केलं आणि त्यांच्या कामाचं कौतुक केलं. जिओ स्टुडिओज यांचेदेखील सोनू निगम यांनी आभार मानत सांगितलं की, "जिओ स्टुडिओज मराठी नेहमीच काहीतरी नवा कन्टेन्ट प्रेक्षकांसमोर आणण्याच्या प्रयत्नात असतं, जे खरोखरंच प्रशंसनीय आहे." 

सुंदर आवाज, सुंदर कंपोझिशन, सुंदर चित्रीकरण असल्यामुळे रसिक प्रेक्षकांकडून या गाण्याला चांगलीच पसंती मिळाली आहे. 

जिओ स्टुडिओज प्रस्तुत 'संगीत मानापमान' या चित्रपटात सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी सोबत सुमित राघवन, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित 'संगीत मानापमान'चे म्युझिक लेबल सारेगामा आहे. 'संगीत मानापमान' हा संगीतमय चित्रपट 10 जानेवारी 2025 पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
Sucess Story: आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

All Party Leader Meet Governer Mumbai : सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट,काय मागणी केली?Dr Ravi Godse On HMPV virus : एचएममपीव्हीची व्हायरस नेमका काय आहे? डॉ. रवी गोडसेंनी सविस्तर सांगितलंABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 06 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सWhat Is HMPV virus : चीनमध्ये HMPV व्हायरस, जगाला धडकी; नवा व्हायरस कोरोनापेक्षाही घातक?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
Sucess Story: आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
What is Human Metapneumovirus In India : भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
Human Metapneumovirus : भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
Nandurbar News : मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीच्या मोठ्या हालचाली, वाल्मिक कराडला मकोका लागणार?
मोठी बातमी: वाल्मिक कराडला मोक्का लागणार? सीआयडीच्या हालचालींना वेग
Embed widget