एक्स्प्लोर

Nashik Nagarparishad Election 2025: राज ठाकरेंच्या मनसेचा धक्कादायक निर्णय, नाशिक नगरपरिषदेच्या निवडणुकीतून अचानक माघार, नेमकं काय घडलं?

Nashik Nagarparishad Election 2025: मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

Nashik Nagarparishad Election 2025: मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातल्या 246 नगरपरिषदा (Nagarparishad) आणि 42 नगरपंचायत (Nagarpanchayat) निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छूक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. काल रविवार सुट्टीचा दिवस असताना सुध्दा मोठ्याप्रमाणावर अर्ज दाखल करण्यात आले. त्यातच आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांकडून मोठे शक्ती प्रदर्शनं करत उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. अखेरच्या क्षणापर्यंत कोणकोण अर्ज भरणार आणि त्यानंतर अर्ज माघारीसाठी कोण तडजोड करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्याच दिवशी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीतून (Nashik Nagarparishad Election 2025) मनसेने माघार घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिक जिल्ह्यातील 11 नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकही अधिकृत उमेदवार उभा राहणार नाही. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निवडणूक न लढण्याच्या सूचना दिल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नाशिक नगरपरिषदेची निवडणूक देखील एकत्र लढणार असल्याची चर्चा रंगली असताना आज राज ठाकरे यांनी अचानक नाशिक नगरपरिषदेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेताला आहे.

 नाशिकमध्ये काय घडलं होतं? (Nashik Nagarparishad Election 2025)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेसह महाविकास आघाडीने एकत्र येत चर्चा केली होती. तसेच नाशिकमध्ये मनसेसह महाविकास आघाडीने पत्रकार परिषद देखील घेतली होती. याच पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसमध्ये वादळ निर्माण झालं होतं. काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल दिवे यांनी मनसेसोबत जाण्याची भूमिका मांडल्यानंतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मनसेसोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला होता. 

मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करुन घेण्यास काँग्रेसचा होता विरोध- (Congress On MNS 2025)

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची (Local Body Election) रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र येणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र काँग्रेसने (Congress) मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यास विरोध दर्शविल्याचे याआधी दिसून आले होते.

संबंधित बातमी:

Maharashtra Nagarparishad And Nagarpanchayat Reservation: नगरपरिषद अन् नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर, तुमचा नगराध्यक्ष कोण, संपूर्ण यादी!

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Nashik News: रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना
रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना
Nashik Pune Railway: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Embed widget