एक्स्प्लोर

'आता बघवत नाहीय' सोनम वांगचुक यांच्या सपोर्टसाठी आख्खं बॉलिवूड एकवटलं! सोनाक्षी सिन्हासह, या सेलिब्रेटींचे सरकारला थेट सवाल

अभिनेता इमरान खान, फातिमा सना शेख आणि सोनाक्षी सिन्हा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली.

Bollywood Actors Support Sonam Wangchuk:नीट-यूजी (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणावरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज (16 जुलै) 19 वा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी वांगचूक यांना पाठिंबा दर्शवला असून सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन संवाद साधावा, अशी मागणी केली आहे. अभिनेता इमरान खान, फातिमा सना शेख आणि सोनाक्षी सिन्हा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली.

इमरान खानची पोस्ट चर्चेत 

अभिनेता इमरान खानने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत नीट पेपरफुटी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. "गेल्या काही आठवड्यांपासून नीट (NEET) घोटाळ्याभोवती जे काही सुरू आहे, ते पाहून अक्षरशः डोकंच फिरल्यासारखं वाटतंय… स्वतःच्याच शहाणपणावर शंका घ्यावीशी वाटतेय. विद्यार्थ्यांकडून प्रामाणिकपणे परीक्षा देण्याची अपेक्षा केली जाते, तर परीक्षा घेणाऱ्या संस्थांनीही तितकीच जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हा राजकीय वाद नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित मुद्दा आहे, ज्या लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी मी उभा आहे. तुमच्या संघर्षाला माझा सलाम." असं तो म्हणालाय.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Imran Khan (@imrankhan)

फातिमा सना शेखची भावनिक पोस्ट

अभिनेत्री फातिमा सना शेखनेही सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली. जंतर-मंतरवरील आंदोलनातील काही छायाचित्रांसह तिने, "19 दिवस झाले आहेत. खूप उशीर होण्यापूर्वी आपण त्यांचं ऐकायला हवं. देशासाठी इतकं योगदान देणाऱ्या व्यक्तीला आपला आवाज पोहोचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचा  धोका पत्करावा लागणं अत्यंत वेदनादायी आहे. या आंदोलनाचा शेवट संवादाने व्हावा, सोनम वांगचूक यांना गमावून नव्हे. देशाचं भविष्य घडवणाऱ्या तरुणांच्या न्याय्य हक्कांसाठी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं," असेही ती म्हणाली 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh)

सोनाक्षी सिन्हाचाही सरकारला सवाल

सोनाक्षी सिन्हाने व्हिडीओ संदेशाद्वारे वांगचूक यांना पाठिंबा दर्शवला. "मी यापूर्वी कधीही कोणतेही विधान केलेले नाही, पण आता मी गप्प बसू शकत नाही. सोनम यांच्यासारखी एक प्रतिष्ठित व्यक्ती विद्यार्थ्यांसाठी 18 दिवसांपासून उपोषणावर बसली आहे आणि तरीही सगळे गप्प आहेत. आता मी आवाज उठवणार आहे. आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आपल्यालाही आपले मत मांडण्याचा अधिकार असायला हवा. मला भीती वाटत नाही, जे होईल ते पाहू अशी प्रतिक्रिया अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने दिली आहे. सरकारने सोनम यांच्याशी चर्चा केली पाहिजे असेही सोनाक्षी सिन्हा म्हणाली. सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी अधिकाधिक लोक पुढे येत असल्याचेही ती म्हणाली."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

अनेक कलाकारांचा पाठिंबा

याआधी शबाना आझमी, झीनत अमान, प्रकाश राज, नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, अभय देओल, सोनी राजदान आणि ओमी वैद्य यांसारख्या कलाकारांनीही सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. हिंदी कलाकारांसह मराठी मनोरंजनविश्वातुनही वांगचुक यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया उमटत आहेत. अतुल कुलकर्णी, हेमंत ढोमे, उमेश कामत, सयाजी शिंदे यांच्यासह अनेकांनी वांगचुक यांना पाठिंबा दर्शवलाय. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Himanshi Khurana: 'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
Box Office Collection: पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?
पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?
Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget