Sonam Kapoor : सोनम कपूरच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन? फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण
सोनमच्या (Sonam Kapoor) घरी चिमुकल्या पाहूण्याचे आगमन झाले आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली.
Sonam Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) घरी लवकरच नव्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. सोनमचा पती आनंद आहूजानं (Anand Ahuja) काही दिवसांपूर्वी बेबी शॉवर पार्टीचे आयोजन केलं होतं. आता सोनमचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सोनम ही रुग्णालयाच्या बेडवर झोपलेली दिसत आहे. तिच्या जवळ एक बाळ देखील दिसत आहे. फोटोमध्ये सोनमच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. त्यामुळे सोनमच्या घरी चिमुकल्या पाहूण्याचे आगमन झाले आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. पण या फोटोमागील सत्य जाणून घेऊयात...
सोनम कपूरचा हा व्हायरल झालेला फोटो फेक आहे. हा फोटो एडिट केलेला आहे. एका दुसऱ्या व्यक्तीच्या फोटोवर सोनमचा फोटो एडिट करुन हा फोटो तयार करण्यात आला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे सोनम आणि आनंद आहूजा यांच्या घरी चिमुकल्या पाहूण्याचे आगमन झाले आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. पण सोनम आणि आनंद अहूजा यांनी अशा प्रकारचा कोणताही फोटो शेअर केला नाही.
View this post on Instagram
पाहा व्हायरल फोटो:
सोनमनं मार्च 2022 मध्ये ती प्रेग्नंट असल्याची माहिती नेटकऱ्यांना दिली होती. त्यानंतर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या. सोनम बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. सोनम कपूरने 2018 साली तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लग्न केले. आता लवकरच सोनम आणि आनंद हे आई-बाबा होणार आहेत.
सोनमचे आगामी चित्रपट
2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके' हा चित्रपट रिलीज झाला होता. आता लवकरच ती ब्लाइंड या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये सोनमसोबत अभिनेता पूरब कोहली आणि विनय पाठक हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. डिलेव्हरी नंतर सोनम या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. सोनम सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते.
हेही वाचा: