एक्स्प्लोर

'अहो शेठ लय दिसान झालीया भेट' , सोनाली सोनावणेची पहिलीच लावणी ठरली हिट!

Sonali Sonawane New Song : सोनालीची ‘माझी बाय गो’, ‘मी नादखुळा’, ‘पिरतीचं गाव’, ‘पोरी तुझे नादानं’ अशी तिने गायलेली कित्येक गाणी बऱ्याच म्युझिक प्लॅटफॉर्मवर ट्रेंडीग आहेत.

Sonali Sonawane New Song : सोशल मीडियावर ट्रेंडीग सिंगर म्हणून प्रसिद्ध असणारी गोड गळ्याची गायिका सोनाली सोनावणे (Sonali Sonawane) हीच्या जादुई आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं आहे. ‘माझी बाय गो’, ‘मी नादखुळा’, ‘पिरतीचं गाव’, ‘पोरी तुझे नादानं’ अशी तिने गायलेली कित्येक गाणी बऱ्याच म्युझिक प्लॅटफॉर्मवर ट्रेंडीग आहेत. नुकतचं 'अहो शेठ लय दिसान झालीया भेट' या तिने गायलेल्या पहिल्याच लावणीने 10 मिलीयन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. तसंच, ही लावणी सोशल मीडिया व बऱ्याच कार्यक्रमांमध्ये सादर केली जात आहे. तिच्या जादुई आवाजाच्या अनोख्या शैलीमुळे तिची पहिलीच लावणी तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे.

गायिका सोनाली सोनावणे तिच्या पहिल्याच लावणीविषयी बोलताना सांगते, ‘लहानपणापासून मी सुलोचना चव्हाण आणि सुरेखा पुणेकर यांच्या लावणी ऐकत आली आहे. सुरेखा पुणेकर स्वत: लावणी गाऊन नृत्य देखील करायच्या. त्यामुळे त्यांच्या नजाकत, अदाकारी, लहेजा याचं बारीक निरीक्षण मी लहानपणी करायचे. नुकतचं त्यांनी एका कार्यक्रमात हीच लावणी सादर केली होती. हे ऐकून फारचं भारी वाटलं. मला गायनासोबत नृत्याची देखील आवड आहे. त्याचा फायदा मला ही लावणी गाताना झाला. 'अहो शेठ' ही माझी पहिलीच लावणी आहे. बऱ्याच दिवसांपासून माझी इच्छा होती की, मला एखादी लावणी गायची आहे. मी आधी नृत्य आणि गायन दोन्ही करायचे. मी शाळा, कॉलेजमध्ये असताना अनेक नृत्य आणि गायनाच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. मी अनेक कार्यक्रमांमध्ये लावणीचे लाईव्ह परफॉर्मन्स देखील केले आहेत. जेव्हा मला कॉल आला की, तुला एक लावणी गायची आहे. तेव्हा मी फार उत्सुक होते. ही लावणी ऐकता क्षणी मला ती आवडली.’

सोनाली रेकॉर्डींगचा किस्सा सांगताना म्हणते, ‘लावणी गाणं हे फार कठीण आहे. कारण लावणी हा प्रकार वेगळा आहे. लावणी गाण्याची शैली वेगळी असते. कंम्पोझरला व्हाईस टेक्सचर कसा हवा आहे. गाण्याच्या हरकती कश्या पद्धतीच्या हव्यात हे सर्व मलाच पाहावं लागलं. मी रेकॉर्डींग रूममध्ये गेले, तेव्हा फारच उत्सुक होते आणि लावणी गाताना माझ्यात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आली. खरंतर, रोमॅंटीक, मेलोडीअस अश्या वेगवेगळ्या धाटणीची गाणी गायला मला खूप आवडतात. शिवाय ही माझी पहिली लावणी असल्याने मी प्रत्येक शब्द, ताल, सूर यांचा सारासार अभ्यास केला होता. मी गाणं रेकॉर्ड करून कंपोझरला पाठवलं. ते त्यांना फार आवडलं. पहिल्याच प्रयत्नात म्युझिक कंपोझर नसतानाही माझं गाणं त्यांना आवडलं. हीच माझ्यासाठी पोचपावती आहे. माझ्या पहिल्याच लावणीला रसिक प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहून स्वप्नपूर्ती झाल्यासारखं वाटतं. तुमचे प्रेम असेच कायम राहो.’

हेही वाचा :

 

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Aamir khan and gauri spratt wedding: 100-150 लोकांची गेस्ट लिस्ट; जेवणात कोणते पदार्थ असणार? आमिर अन् गौरीच्या लग्नातील Inside माहिती समोर
100-150 लोकांची गेस्ट लिस्ट; जेवणात कोणते पदार्थ असणार? आमिर अन् गौरीच्या लग्नातील Inside माहिती समोर
Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल' ची दुसऱ्या आठवड्यात दमदार एन्ट्री; 8व्या दिवशी किती कोटी कमावले? 100 कोटींकडे झेप
'वेलकम टू द जंगल' ची दुसऱ्या आठवड्यात दमदार एन्ट्री; 8व्या दिवशी किती कोटी कमावले? 100 कोटींकडे झेप
OTT Crime Thriler: OTT वर 2 तास 43 मिनिटांच्या क्राईम थ्रिलरचा धुमाकुळ; सत्ता अन् भीतीच्या आड लपलेला हादरवून टाकणारा थरार 
OTT वर 2 तास 43 मिनिटांच्या क्राईम थ्रिलरचा धुमाकुळ; सत्ता अन् भीतीच्या आड लपलेला हादरवून टाकणारा थरार 

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Devendra Fadnavis on Mumbai Rain: मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार; यलो मेट्रो बंद पडली, विरारमध्ये धडकी भरवणारी दृश्यं
मुंबईकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार; यलो मेट्रो बंद पडली, विरारमध्ये धडकी भरवणारी दृश्यं
Embed widget