Samantha Ruth Prabhu : समंथा झाली आई; पतीसोबत शेअर केली बाळाची पहिली झलक, मुलाचं बारसंही केलं, नावाचा अर्थ काय?
Samantha Ruth Prabhu Welcomes Baby Boy : समंथा आणि राज यांनी आपल्या मुलाचं नाव 'देव निदिमोरू' असं ठेवलं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर बाळाचा एक खास फोटो शेअर केला आहे.

Samantha Ruth Prabhu Welcomes Baby Boy : साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या (Samantha Ruth Prabhu) घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. समंथाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. समंथा आणि राज निदिमोरू यांच्या घरी 19 नोव्हेंबर रोजी लहान बाळाने जन्म घेतला आहे. या आनंदाच्या बातमीची माहिती समंथाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना दिली आहे. विशेष म्हणजे, या पोस्टमधून तिने मुलाचं नावही जाहीर केलं आहे.
View this post on Instagram
समंथा आणि राजने मुलाचं नाव ठेवलं 'देव'
समंथा आणि राज यांनी आपल्या मुलाचं नाव 'देव निदिमोरू' असं ठेवलं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर बाळाचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सामंथा आणि राज आपल्या चिमुकल्याचा हात प्रेमाने हातात घेताना दिसत आहेत. मात्र, त्यांनी अद्याप बाळाचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही.
हा फोटो शेअर करत सामंथाने लिहिलं, 'आमचा सुंदर मुलगा, देव निदिमोरू. 19 नोव्हेंबर 2026. आज आमची मनं जितकी आनंदी आहेत, तितकी यापूर्वी कधीच नव्हती.' समंथाच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी आणि मनोरंजनविश्वातील कलाकारांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
'देव' नावाचा अर्थ काय?
समंथा आणि राज यांनी मुलासाठी निवडलेलं 'देव' हे नाव संस्कृत भाषेतून आलेलं आहे. या नावाचा अर्थ ईश्वर, परमेश्वर, दैवी शक्ती असा होतो. भारतीय संस्कृतीमध्ये देव हे नाव पवित्रता, सकारात्मकता आणि दैवी गुणांचं प्रतीक मानलं जातं.
बाळाच्या जन्मापूर्वी घरी केली होती खास पूजा
बाळाच्या आगमनापूर्वी समंथा आणि राज यांनी घरी पारंपरिक पद्धतीने खास पूजा आयोजित केली होती. 17 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या पूजेला दोघांच्याही कुटुंबातील जवळचे नातेवाईक उपस्थित होते. आई आणि बाळाचं आरोग्य चांगलं राहावं, प्रसूती सुखरूप पार पडावी आणि बाळाला दीर्घायुष्य लाभावं, यासाठी धार्मिक विधी करण्यात आले.
या पूजेचे काही फोटो समंथाने सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी ती लाल रंगाच्या पारंपरिक पोशाखात दिसली, तर राजने क्रीम रंगाचा कुर्ता परिधान केला होता. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींनी समंथाला आशीर्वाद दिले होते. आता बाळाच्या जन्मानंतर या फोटोंचीही पुन्हा चर्चा होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Keerthy Suresh : अभिनेत्री कीर्ती सुरेशला दिग्दर्शकाने सर्वांदेखत नको तिथे स्पर्श केल्याचा व्हिडीओ व्हायरल, पण अभिनेत्रीने ट्रोलर्सना सुनावलं; म्हणाली, 'आमचं नातं...





















