एक्स्प्लोर

Sonalee Kulkarni : ‘काय काय झालं, कसं झालं, कुठे झालं, सगळं सांगू लवकरच!’, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत!

Sonalee Kulkarni : मराठी मनोरंजन विश्वाची ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या सौंदर्याने सर्वांनाच मोहित करत असते. नुकतीच अभिनेत्री दुसऱ्यांदा बोहल्यावर चढली आहे.

Sonalee Kulkarni : मराठी मनोरंजन विश्वाची ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) तिच्या सौंदर्याने सर्वांनाच मोहित करत असते. नुकतीच अभिनेत्री दुसऱ्यांदा बोहल्यावर चढली आहे. अर्थात तिने पती कुणाल बेनोडेकरसोबतच पुन्हा लग्नगाठ बांधली आहे. या लग्नामुळे अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोनाली कुलकर्णी हिने गेल्या वर्षी कुणाल बेनोडेकर याच्यासोबत दुबईत विवाह केला होता. या दरम्यान जवळपास जगभरात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन लागला होता.

मागील दोन वर्षात कोरोना विषाणूने भारतच नव्हे, तर जगभरात थैमान घातलं होतं. या महामारीमुळे लोक घरात अडकून पडले होते. कुणालाही कुठेही जाता येत नव्हतं. लग्नसोहळे, समारंभ तर रद्दच करण्यात आले होते. अशावेळी सोनाली कुलकर्णीचं लग्न देखील दोन वेळा पुढे ढकलण्यात आलं होतं. तर, तिसरीवेळ तर ते रद्दच झालं होतं. अशा वेळी त्यांनी दुबईत असताना कोर्ट रजिस्टर लग्न करण्याचा निर्णय घेत, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा केला. मात्र, या सोहळ्याला दोघांचेही आई-वडील उपस्थित नव्हते.

... म्हणून घेतला पुन्हा लग्न करण्याचा निर्णय!

सोनाली आणि कुणाल यांच्या लग्नाला दोघांचेही कुटुंब व्हिडीओ कॉलद्वारे उपस्थित होते. त्यामुळे अगदीच घाईगडबडीत पार पडलेल्या या लग्नात कुणालाच सामील होता आलं नाही. ना कोणते सोहळे आयोजित झाले, ना समारंभ.. यामुळे सोनाली आणि कुणाल यांनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पुन्हा एकदा थाटामाटात लग्न करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण विधीपूर्वक मराठमोळ्या पद्धतीने त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला आहे. या लग्नाला दोघांच्या कुटुंबासह, मनोरंजन विश्वातील कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.

सोनालीची पोस्ट चर्चेत...

सोनाली देखील तिच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट प्रेक्षकांसोबत शेअर करण्यासाठी उत्सुक आहे. लवकरच ती या लग्नाचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करणार आहे. या संदर्भात पोस्ट लिहित सोनाली म्हणाली, ‘पँडेमिकमुळे दोन वेळा पोस्टपोन करून तिसऱ्यांदा कॅन्सल करावा लागला आमचा लग्न सोहळा. मग दुबईत अडकल्यामुळे किमान आता रजिस्टर लग्न करून टाकू असं ठरवलं. आमच्या आई वडील, कुटुंबियांना ट्रॅव्हल करता नाही आलं. झूम कॉलवरून साक्षीदार झाले. पुढे जेव्हा परिस्थती सुधारेल तेव्हा सगळे एकत्र येऊ आणि सेलिब्रेट करू अशा आशेवर, गेल्या वर्षी 07.05.2021ला आम्ही कोर्ट मॅरेज केलं.

यंदा, आमच्या पहिल्या वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरीला आम्ही सह कुटुंब-सह परिवार-ठरल्या प्रमाणे-संपूर्ण विधीपूर्वक- मराठमोळ्या पद्धतीने-अगदी स्वप्नवत-लग्न केलं. काय काय झालं, कसं झालं, कुठे झालं, सगळं - सगळं share करू “लवकरच” ! तुमचा आशिर्वाद आणि प्रेम नेहमी प्रमाणे राहू द्या’

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget