(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Soham Bandekar : बांदेकर भावोजी आणि सुचित्रा वहिनींना तुझ्या मालिकेत काम देणार का? लेकानं दिलं मिश्कील उत्तर, म्हणाला इच्छा आहे पण...
Soham Bandekar : अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर हा सध्या दर्जेदार मालिकांची निर्मिती करतोय. पण त्याच्या मालिकांमध्ये आई वडिलांनी एकत्र काम केलेलं आवडेल का यावर सोहमने फार मिश्किल उत्तर दिलं.
Soham Bandekar : सोहम बांदेकर (Soham Bandekar) हा स्टार प्रवाह वाहिनीवरील 'नवे लक्ष्य' या मालिकेतून घरोघरी पोहचला. महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर (Adesh Bandekar) आणि सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांचा लेक सोहम हा 'सोहम प्रोडक्शन हाऊस' (Soham Production House) सांभाळत आहे. प्रेक्षकांना पसंतीस पडणाऱ्या आणि टीआरपीच्या शर्यातीत अव्वल असणाऱ्या मालिकांची निर्मिती ही सोहम प्रोडक्शनच्या बॅनरखाली झाली आहे. सोहमने ठरलं तर मग या मालिकेपासून मालिकेच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तसेच आता याच प्रोडक्शन बॅनरखाली घरोघरी मातीच्या चुली ही नवी मालिका सुरु होत आहे.
दरम्यान तुझ्या आईवडिलांनी तुझ्या मालिकेत एकत्र काम केलं तर आवडेल का असा प्रश्न सोहमला विचारण्यात आला. तेव्हा एका वेब पोर्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोहमने यावर फार मिश्किल उत्तर दिलं. मला त्यांनी माझ्या मालिकेत एकत्र काम केलं तर नक्की आवडेल पण त्या दोघांचा एकत्र पर-डे मला परवडणार नाही, ते दोघेही सध्या माझ्या प्रोडक्शन हाऊससाठी फार खर्चिक आहेत, असं उत्तर सोहमने दिलं. सध्या त्याच्या या उत्तराची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.
आई-बाबांनी काम केलं तर मला नक्की आवडेल - सोहम बांदेकर
माझ्या मालिकेत आईवडिलांनी कॅमियो केला किंवा काम केलं तर मला नक्की आवडेल किंबहुना माझीही तशी इच्छा आहे. पण माझी ही इच्छा एक मुलगा म्हणून आहे. निर्माता म्हणून ते दोघांचा एकत्र पर-डे मला परवडणार नाही. त्यामुळे त्यांनी सेटवर येऊन माझ्यासाठी छान छान इंटरव्यू देणं हेच मला सध्या परडवण्यासारखं असल्याचं सोहमनं यावेळी म्हटलं आहे.
'ठरलं तर मग' या मालिकेपासून मी सुरुवात केली - सोहम बांदेकर
स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या टीआरपीच्या शिखरावर आहे. या मालिकेची निर्मितीही सोहम प्रोडक्शनच्या बॅनरखाली झालीये. यावर बोलताना सोहमनं म्हटलं की, 'ठरलं तर मग'या मालिकेपासून मी प्रोडक्शन बघायला सुरुवात केली आणि माझा निर्माता म्हणून प्रवास सुरु झाला. बाबांनी तेव्हा मला सांगितलं होतं की, तू जर एक चांगला माणूस म्हणून काम केलंस तर त्या कामाचं आऊटपुटही चांगलच येणार. डोक्यात कधीही पैसा, नफा या सगळ्या गोष्टी ठेवून काम करु नकोस. चांगल्या हेतून काम केलंस तर त्याचं यश तुला नक्कीच मिळणार.