एक्स्प्लोर

Social Media Influencer Found Dead: प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरकडून हुंड्यासाठी छळ? लग्नाच्या दीड वर्षांतच बायकोचा संशयास्पद शेवट, स्कॉर्पिओसाठी छळ केल्याचा आरोप

Social Media Influencer Found Dead: लखनौच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या आत्महत्येनं सारेच हादरले आहेत. सादतगंज भागात एका नवविवाहित इन्फ्लुएन्सरचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला.

Social Media Influencer Found Dead: सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) रोहिणी पाराध्ये (Rohini Paradhye) हिनं ज्या हॉटेलात व्हिडीओ करुन लाखो फॉलोअर्सचा टप्पा पार केला, त्याच हॉटेलच्या स्वयंपाक घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. रोहिणी पाराध्येच्या (Influencer Rohini Paradhye) आत्महत्येच्या बातमीनं अख्खा महाराष्ट्र हादरलेला. अशातच आता आणखी एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, लग्नाच्या दीड वर्षांत विवाहितेनं स्वतःचं आयुष्य संपवल्यामुळे (Social Media Influencer Wife Found Dead) सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

लखनौच्या (Lucknow) सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या आत्महत्येनं सारेच हादरले आहेत. सादतगंज भागात एका नवविवाहित इन्फ्लुएन्सरचा (Influencer Wife Death) संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. तिच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या लोकांवर हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप केला आहे. लग्नानंतर सासरच्यांनी 'स्कॉर्पिओ' गाडीची मागणी करण्यास सुरुवात झाली होती, असा दावा माहेरच्यांनी केला आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे, तिचा पती, सासरा, नणंदा आणि सासरची आत्या यांनी तिची हत्या केल्याचा आरोप सासरच्यांकडून केला जात आहे. मानसी असं मृत पावलेल्या तरुणीचं नाव आहे.

मृत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मानसी राजपूत (Mansi Rajput) (वय 23) हिचं लग्न साधारण दीड वर्षांपूर्वी, 'काळा फाटक' इथल्या 'झव्वरन' भागात राहणाऱ्या सागर राजपूत (Sagar Rajput) याच्याशी झालं होतं. तिच्या पश्चात तिचा सहा महिन्यांचा मुलगा आहे. 30 मे रोजी मानसीचा मृतदेह तिच्या सासरच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तिचं माहेर कानपूर येथील 'टीपी नगर' भागातील 'बगाही' इथे आहे. तिच्या  काकांनी याप्रकरणी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

कानपूरच्या टीपी नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या तक्रारदार सुनील कुमार वर्मा यांच्या पुतणीचं लग्न 9 डिसेंबर 2025 रोजी लखनऊच्या सआदतगंजमध्ये राहणाऱ्या सागर राजपूत याच्याशी झाला होता. सागर राजपूतदेखील एक सोशल मीडिया एन्फ्ल्युएन्सर असून त्याचे इन्स्टाग्रामवर 7.93 लाख फॉलोअर्स आहेत. मानसीदेखील सोशल मीडियावर बरीच सक्रिय असायची. 

माहेरच्यांचे सासरच्यांवर हत्येचे आरोप

माहेरच्यांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी आपल्या पुतणीचं लग्न सागर राजपूत यांच्याशी लावून दिलेलं. लग्नात ऐपतीनुसार सासरच्या मंडळींना जवळपास 7 लाख रुपये, घरातील साहित्य दिलं होतं. पण तरीही सासरच्यांचं समाधान झालं नाही. लग्नानंतरच त्यांनी मानसीला हुंड्यासाठी टोमणे मारायला सुरुवात केलेली. त्यानंतर हळूहळू त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ वाढला. मानसीचा पती सागर, सासरे राजेश, नणंद बरखा आणि चांदनी, सासू आशा यांच्याकडून सातत्यानं हुंड्याची मागणी केली जात होती. 

सासरच्या घरी होत असलेल्या छळाची माहिती देण्यासाठी मानसीनं वारंवार माहेरच्यांना फोन केले होते. दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणण्याच्या उद्देशानं कुटुंबातील सदस्यांनी अनेकदा लखनौला प्रवास केला. हे लग्न नुकतंच झालं आहे आणि कालांतरानं परिस्थिती सुधारेल, असं समजावून सांगत त्यांनी तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. तिचे काका, सुनील कुमार वर्मा यांनी सांगितलं की, "शनिवारी, नातेवाईकांकडून आम्हाला अशी बातमी मिळाली की, आमच्या पुतणीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे. मात्र, वस्तुस्थिती तशी नव्हती, हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे तिच्या सासरच्या मंडळींनी तिची हत्या केली. त्यानंतर, ही घटना आत्महत्या वाटावी यासाठी त्यांनी तिचा मृतदेह लटकवून ठेवला...." या प्रकरणी तिच्या पतीसह सहा व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mangalwedha Reel Star Rohini Paradhye Ends Life: दुसरं लग्न, आंतरजातीय प्रेमविवाह अन् हॉटेल ग्रामपंचायतच्या दोन नव्या शाखा; इन्स्टाग्रामवरील रिल स्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्याचा दोर का कापला?

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
Advertisement

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget