स्मृतीच्या वडिलांची तब्येत खालावली,'संगीत' नंतर अचानक आनंदावर विरजण पडलं, पोस्ट हटवल्या अन् आता थेट पलाशसोबत लग्न मोडलं; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
अखेर स्मृती आणि पलाश दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीतून अधिकृत घोषणा करत लग्न रद्द झाल्याची माहिती दिली आहे.

Smriti Mandhana Palash Muchchal wedding called off: टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत होते ते त्यांच्या लग्नामुळे. 20 नोव्हेंबरला दोघांचा साखरपुडा झाला. त्यानंतर मोठ्या थाटामाटात त्यांच्या लग्नाची तयारी सुरू होती. सगळे समारंभ ही दणक्यात पार पडत होते. दोघांचेही मेहंदी, हळद, संगीत समारंभातील धमाल करतानाचे फोटो व्हिडिओ चाहत्यांनी अक्षरशः उचलून धरले होते. लग्नाच्या आदल्या दिवशी अचानक आनंदावर विरजण पडलं. सगळी परिस्थिती बदलली. स्मृती मंधानाच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुसरीकडे पलाश मुच्छलचीही तब्येत बिघडल्याने त्यालाही ऍडमिट करण्यात आलं होतं. या दोन्ही घडामोडी नंतरच सोशल मीडियावर त्यांच्या लग्नात अडथळे येत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
लोकांनी तर्कवितर्क लावायला सुरुवात केली. स्मृतीने instagram पोस्ट डिलीट केल्या. नंतर लग्न पुढे ढकलल्याचा बातमीने सोशल मीडियावर पलाश चे काही चॅट व्हायरल झाले. एका महिलेने हे स्क्रीन शॉट शेअर करत पलाश सोबत झालेली फ्लरिटी चार्ट असल्याचा दावा केल्याने अफवांना उधाण आलं. या सगळ्या अफवांना वैतागून आज अखेर स्मृती आणि पलाश दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीतून अधिकृत घोषणा करत लग्न रद्द झाल्याची माहिती दिली आहे. पलाश आणि स्मृतीच्या चाहत्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल गोपनीयता राखावी असं आवाहन त्यांनी केलंय.
लग्नाच्या आदल्या दिवशी काय घडलं ?
स्मृती आणि पलाशच्या लग्नाच्या विधींना धुमधडाक्यात सुरुवात झाली होती. लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत सांगलीत सगळं काही नीट सुरू होतं. पण अचानक स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं. स्मृतीने कोणताही विचार न करता लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी पलाश मुच्छलही प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल झाला. दोन्ही कुटुंबावर आलेल्या या दुहेरी संकटामुळे लग्न स्थगित झालं होतं. याच काळात स्मृतीने आपल्या लग्नाच्या सर्व पोस्ट अगदी प्रपोज केलेला व्हिडिओ सुद्धा डिलीट केला. त्यामुळे चर्चांना अधिक उधाण आले. दोघांमध्ये काही बिनसलं आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या. पण या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत कुटुंबीयांनी लग्न मोडलं नसून ते काही काळासाठी पुढे ढकळण्यात आल्याचं सांगितलं.
चॅट स्क्रीनशॉट व्हायरल
दरम्यान लग्न पुढे ढकल्ल्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर काही चॅट स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते. एका महिलेने हे स्क्रीन शॉट शेअर केले जात पलाश सोबत झालेली कथेत फ्लर्टींग चॅट असल्याचा दावा करण्यात आला होता. सोशल मीडियावर अनेक स्क्रीनशॉट व्हायरल होऊ लागले ज्यामध्ये पलाशवर मेरिडिकोस या नावाच्या महिलेवर स्मृतीची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही स्क्रीनशॉट किती खरे किंवा खोटे आहेत याची पुष्टी झाली नसली तरी नेटिझन्सकडून पलाशवर टिकेची झोड उठली. सोशल मीडियावर आणखी चर्चा झाली तेव्हा चाहत्यांना स्मृती मानधनहीने आपल्या इंस्टाग्राम वरून हळद, मेहंदी आणि साखरपुडा अशा विवाहांशी संबंधित सर्व पोस्ट हटवल्याचे दिसलं. वातावरण शांत करण्यासाठी आणि अनावश्यक अफवांना आळा घालण्यासाठी तिने ह्या पोस्ट हटवल्याचही बोललं जात होतं.
दुसरीकडे पलाशच्या आई लग्न लवकरच होईल असं आश्वासक बोलत होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना पलाश आणि स्मृतीच्या विवाहाची नवी तारीख कधी जाहीर होते याची उत्सुकता लागली होती. मात्र दोघांनीही आज instagram स्टोरी टाकत लग्न मोडल्याचे अधिकृत घोषणा केली.
आता पुढे जाण्याची वेळ आली आहे
स्मृती मानधनाची पोस्ट,''आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं ध्येय असतं. माझ्यासाठी ते नेहमीच भारतासाठी सर्वोच्च स्तरावर क्रिकेट खेळणं आणि देशासाठी जास्तीत जास्त विजेतेपदं जिंकणं हेच आहे. पुढेही माझं पूर्ण लक्ष याच गोष्टीवर राहणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे.
पलाश मुच्छलने सुद्धा लग्न मोडल्याची माहिती दिली
दरम्यान, स्मृतीने इन्स्टा स्टोरीवरून लग्न मोडल्याची माहिती दिल्यानंतर पलाश मुच्छलने सुद्धा इन्स्टा स्टोरी पोस्ट करत लग्न रद्द केल्याची माहिती दिली आहे. पलश मुच्छलने म्हटलं आहे की, मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नातेसंबंधातून मागे सरकण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनी कोणताही आधार नसलेल्या अफवांवर इतक्या सहज विश्वास ठेवून प्रतिक्रिया देताना पाहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टींबद्दल या अफवा पसरल्या, आणि हा माझ्या आयुष्यातला फार कठीण काळ आहे, पण मी माझ्या मूल्यांवर ठाम राहून शांतपणे याला सामोरं जाईन.























