एक्स्प्लोर

Sidharth Bhardwaj Life Story: 'कुत्राच्या चैननं वडिलांना मारलेलं...'; अभिनेत्याचा कबुलीनामा, अंगावर शहारे आणणाऱ्या 'त्या' गोष्टींबाबत स्वतःच केलाय खळबळजनक खुलासा

Sidharth Bhardwaj Life Story: अभिनेता सिद्धार्थ भारद्वाज यानं सिद्धार्थ कननच्या पॉडकास्टमध्ये बोलताना त्याच्या बालवणाच्या वेदनादायी आठवणी सांगितल्या.

Sidharth Bhardwaj Life Story: MTV Splitsvilla Season 2 जिंकल्यानंतर प्रसिद्धीझोतात आलेला आणि नुकताच 'द 50'  शोमध्ये सहभागी झालेला अभिनेता सिद्धार्थ भारद्वाज (Sidharth Bhardwaj) यानं एका मुलाखतीत बोलताना आपल्या आयुष्याबाबत काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. एका मुलाखतीत बोलताना सिद्धार्थ भारद्वाजनं हिंसक वातावरणात गेलेल्या आपल्या बालपणाच्या आठवणींबाबत सांगितलं. ज्या अत्यंत वेदनादायी आणि हादरवणाऱ्या आहेत. त्याने आपल्या स्वतःच्या घरातच त्याला सामोरे जाव्या लागलेल्या अडचणींबद्दल स्पष्ट भाष्य केलं. त्यानं सांगितलं की, त्याचे वडील त्याची आई आणि त्याचा शारीरिक छळ करायचे. एक दिवस, सहनशक्तीचा अंत झाल्यामुळे, सिद्धार्थनं आपल्या वडिलांवर हात उचलला. याच मुलाखतीदरम्यान, त्यानं आपल्या स्वतःच्या वडिलांना मारण्याचा निर्णय नेमका कोणत्या कारणामुळे घेतला? याबाबतही स्पष्टीकरण दिलंय.

अभिनेता सिद्धार्थ भारद्वाज (Actor Siddharth Bhardwaj) यानं सिद्धार्थ कननच्या पॉडकास्टमध्ये बोलताना त्याच्या बालवणाच्या वेदनादायी आठवणी सांगितल्या. त्यानं सांगितलं की, "माझा जन्म दिल्लीतील चंदेरवाल गावात झाला, जे 80 च्या दशकात गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध होतं. त्या काळात दिल्लीतील चार मोठे गँगस्टर याच गावातील होते. माझे वडील बॉक्सर होते, बिल्लू बॉक्सर आणि ते त्या गँगस्टर्ससाठी हिटमॅन म्हणून काम करत होते. हे लोक दिल्लीतील माफिया नेटवर्क चालवत होते..."

सिद्धार्थने पुढे सांगितलं की, त्या धोकादायक वातावरणातून कुटुंबाला बाहेर काढण्यात त्यांच्या आईची महत्त्वाची भूमिका होती. "माझ्या जन्मानंतर आईनं वडिलांना स्पष्ट केलं की, 'आपण मुलाला अशा वातावरणात वाढवू शकत नाही...' त्यामुळे वडिलांनी सर्व काही मागे सोडण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना मी त्या परिस्थितीत वाढू नये असंच वाटत होतं...” असं तो म्हणाला.

पाच वर्ष अंथरुणाला खिळलेल्या वडिलांना आईनंच सांभाळलं (Sidharth Bhardwaj Childhood)

एका अत्यंत वेदनादायी घटनेनं लवकरच त्यांच्या आयुष्याची दिशा आणखीच बदलून टाकली. सिद्धार्थ भाारद्वाजनं सांगितलं की, "जेव्हा मी साधारण नऊ वर्षांचा होतो, तेव्हा दिल्लीतील रोहिणी भागात एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून कोणीतरी माझ्या वडिलांना खाली फेकून दिलं... वरुन खाली फेकल्यामुळे माझे वडील गंभीररीत्या जखमी झाले आणि संपूर्ण कुटुंब एका दीर्घ, अत्यंत कठीण परिस्थितीत लोटलं गेलं. त्यानंतर, पुढची पाच वर्ष माझे वडील अंथरुणाला खिळून होते, त्यांच्या संपूर्ण शरीरात सळ्या बसवण्यात आलेल्या. माझ्या आईनं काम करायला सुरुवात केली. ती पहाटे 5 किंवा 6 वाजता उठायची, एकटीनंच माझ्या वडिलांना आधार देऊन बाथरुमपर्यंत घेऊन जायची, त्यांना आंघोळ घालून पुन्हा अंथरुणावर नेऊन झोपवायची, आमच्यासाठी स्वयंपाक करायची, आम्हाला शाळेत पाठवायची आणि त्यानंतर स्वतः कामावर जायची..."

वडील आईला मारहाण करायचे, तिचे दातही तोडलेले (Sidharth Bhardwaj Father)

अभिनेता सिद्धार्थ भारद्वाज यानं सांगितलं की, "माझ्या आईनं सर्व काही समर्थपणे सांभाळलेलं, पण माझ्या वडिलांना मात्र ही परिस्थिती स्वीकारणं जमलंच नाही. ते एक 'गँगस्टर' होते, जे नंतर आजारी पडले, जेव्हा ते अखेर बरे झाले, तेव्हा त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. त्यांची पत्नी (माझी आई) त्यांच्यापेक्षा जास्त पैसे कमवत होती, त्यांची मुलं मोठी होत होती आणि स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी ती धडपडत होती. परिणामी, ते अत्यंत हिंसक बनले. माझ्या आईला आणि आम्हाला ते मारहाण करायचे. एकदा तर त्यांनी माझ्या आईच्या तोंडावरच ठोसा मारला आणि अगदी माझ्या डोळ्यांदेखत तिचे सर्व दात पाडले... प्रत्येक दिवसच एक संघर्ष वाटायचा..."

त्यांचा मार खाणं आमच्या आयुष्याचा एक भाग बनलेलं : सिद्धार्थ भारद्वाज

सिद्धार्थ भारद्वाज यानं खुलासा केला की, हिंसाचार हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक नित्याचाच भाग बनला होता. तो म्हणाला, "आम्ही झोपलेले असायचो आणि माझे वडील, पायात बूट तसेच घालून, झोपलेल्या माझ्या आईच्या पोटात लाथा मारायचे... आम्ही दरवाजाला कडी लावून झोपायचो, तरीही ते वारंवार असंच वागत राहायचे. या सर्व गोष्टी आम्ही बाहेरील जगापासून लपवून ठेवल्या होत्या... आम्ही याबाबत कुणालाच सांगायचो नाही."

'त्या' घटनेमुळे वडिलांवर हात उचललेला 

सिद्धार्थ भारद्वाज यानं आपल्यासोबत झालेल्या शारीरिक शोषणाबाबतही सांगितलं. त्यानं म्हटलं की, "वडिल मला खूप मारायचे. माझ्या बहिणीलाही मारायचे. पण तिला माझ्या तुलनेत कमी मारायचे कारण त्यांचा तिच्यावर जीव होता." पुढे सांगताना सिद्धार्थनं सांगितलं की, मी ज्यावेळी 16 वर्षांचा होतो, त्यावेळी मी माझ्या वडिलांवर हात उचललेला. कारण मला दररोज मार खाण, आईला मार खाताना पाहणं खरंच असह्य झालेलं. मला वाटलं की, जर मी त्यांना माघारी मारलं नाही, तर ते कधीच थांबणार नाहीत. त्यामुळे मी माझ्या कुत्र्याची चैन घेतली आणि त्यानं वडिलांना मारलं. दरम्यान, काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. त्यानंतर त्याची बहीण जया भारद्वाजनं क्रिकेटर दीपक चाहर सोबत आपली लग्नगाठ बांधली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Saif Ali Khan First Love: ना ही करिना, ना ही अमृता सिंह; 'या' दिग्गज अभिनेत्रीवर जडलेलं सैफ अली खानचं पहिलं प्रेम, 60 फिल्म अन् 40 शो करुन बनलेली सुपरस्टार, ओळखलं का कोण?

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
Ravi Kishan Loses 18 Kg: नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट
नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Embed widget