Palak Tiwari : 'तुला रॅम्प वॉक करता येत नाही?'; पलक तिवारीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
व्हायरल झालेल्या व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी पलकला ट्रोल केलं आहे.
![Palak Tiwari : 'तुला रॅम्प वॉक करता येत नाही?'; पलक तिवारीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल shweta tiwari daughter palak tiwari troll for her ramp walk video viral on social media Palak Tiwari : 'तुला रॅम्प वॉक करता येत नाही?'; पलक तिवारीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/26/76a931b5125030fddddecc0653f20330_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Palak Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari )मुलगी पलक तिवारी (palak Tiwari) तिच्या स्टाईलनं नेहमीच नेटकऱ्यांची मनं जिंकते. पलकच्या बिझली-बिझली या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. पलक ही नुकत्याच दिल्लीमध्ये पार पडलेल्या एका फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. या फॅशन वीकमध्ये तिनं रॅम्प वॉक देखील केला. पलकच्या या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी पलकला ट्रोल केलं आहे.
ब्लॅक कलरचा ड्रेस आणि हाय हिल्स अशा लूकमध्ये पलकनं फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला. यावेळी एका स्मार्ट वॉचच्या ब्रँडची ती शो- स्टोपर झाली होती. पलकच्या या रॅम्प वॉकचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हा रॅम्प वॉक खूप भीतीदायक आहे.' तर दुसऱ्यानं कमेंटमध्ये लिहिलं, 'तुला रॅम्प वॉक करता येत नाही?' एक युझर म्हणाला, 'राहूदेत, एका व्यक्तीला प्रत्येक गोष्ट येईलच असं नाही. तू रॅम्प वॉक करु नको.'
View this post on Instagram
ट्रोलर्सला श्वेता देते सडेतोड उत्तर
सोशल मीडियावर काही लोक पलकला कुपोषित अशी कमेंट करू ट्रोल करतात. या ट्रोलर्सला सडोतेड उत्तर देत श्वेता एका मुलाखतीमध्ये म्हणाली, 'लोक पलकला सुकडी, कोपषित असं म्हणत ट्रोल करतात. पण मी तिला याबाबत काहीच बोलत नाही कारण मला वाटत तुम्ही जसे आहात तसेच सुंदर आहात. तुम्ही हेल्दी आयुष्य जगत असाल तर या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तिची बॉडी कशी आहे? या गोष्टीचा मी जास्त विचार करत नाही कारण ती हेल्दी आहे. '
हार्डी संधूच्या बिजली बिजली या गाण्यामधून पलकनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ती लवकरच विशाल मिश्रा यांच्या रोजी: द सॅफरन चॅप्टर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. पलक ही 21 वर्षाची आहे. कमी वयात पलकला चांगली लोकप्रियता मिळाली.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)