एक्स्प्लोर

Shubhangi Gokhale : मला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही हे सांगणारे तुम्ही कोण? गणेशोत्सवावरील वक्तव्यावर झालेल्या ट्रोलिंगनंतर शुभांगी गोखलेंचा सवाल 

Shubhangi Gokhale : अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी गणेशोत्सवावर केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. त्यानंतर आता त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Shubhangi Gokhale : सार्वजनिक गणेशोत्सवर आता बंद व्हायला हवेत, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) यांनी दिली होती. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच त्यांनाही मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. या सगळ्यात देवाची होणारी विटंबना, सणाचं होणार अवडंबर या सगळ्यावर शुभांगी गोखले यांनी त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलं होतं. पण त्यावर तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात आली. 

यासगळ्यावर आता शुभांगी गोखले यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. शुभांगी गोखले यांनी नुकतीच बीबीसी मराठीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये आलेल्या धमक्या, हा सण आता बंद व्हावा असं का वाटतं या सगळ्या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे शुभांगी गोखले यांनी त्यांच्या वक्तव्याचंही स्पष्टीकरण दिल्याचं पाहायला मिळालं आहे. 

'माझ्या एका मताने तो उत्सव बंद नाही होणार'

गणेशोत्सवावर केलेल्या वक्तव्यानंतर झालेल्या ट्रोलिंगवर उत्तर देताना शुभांगी गोखले यांनी म्हटलं की, मला सुरुवातीला अत्यंत शिव्या देणारे मेसेज आले.  अनेकांनी तर फोन नंबर शोधून धमक्या देखील दिल्या.  मुलुंडच्या एका गणेशोत्सवाच्या कोणत्यातरी अधिकाऱ्यांनी तर फार अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तुला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही वैगरे असं सांगण्यात आलंय. तुम्ही त्या मंडपाच्या इथे दारु पिणार, पत्ते खेळणार, यावर मी माझं मत मांडलं तर मला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही हे सांगणारे तुम्ही कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढे त्यांनी म्हटलं की, मी त्यांना म्हटलं की, दादा तुमच्या शिव्या तुमच्याजवळ ठेवा, तुमच्यावर मी योग्य ती कारवाई करेनच. मला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की, माझ्या एका मताने तो उत्सव पूर्णपणे बंद होणार नाही. त्यामागे खूप गोष्टी आहेत. 

चोवीस तास गाणी लावणे हा कुठला उत्सव?

मी पुण्या-मुंबईत राहत नसले तरी तो गणेशोत्सव मी पाहिला होती. पण त्यामध्ये सात्विकता होती आणि खरंच तो धार्मिक होता उत्सव. माझी गणपतीवर खूप श्रद्धा आहे. पण आताची गर्दी, गोंगाट आणि मुख्यत: चोवीस तास गाणी लावणे हा कुठला उत्सव? त्यामुळे ती सात्विकता, ते पावित्र्य आपण जपत नाही आहोत. हे अनेक वर्षांपासून बघून बघून माझं मत झालं आणि ते आता व्यक्त झालं, असंही शुभांगी गोखले यांनी म्हटलं. 

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 : आठवडाभर घरात घातला राडा, आता रितेश भाऊच्या धक्क्यावर कुणाची घेतली जाणार शाळा? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
Embed widget