एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : आठवडाभर घरात घातला राडा, आता रितेश भाऊच्या धक्क्यावर कुणाची घेतली जाणार शाळा? 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचा पहिला विकेंडचा वार आता पार पडणार आहे. त्यामध्ये कोणाला धक्का बसणार याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिलीये. 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनच्या (Bigg Boss Marathi Season 5) पहिल्याच आठवड्यात घरात स्पर्धकांनी राड्यावर राडे घातले. घरातले वाद, होणारे नियमभंग यामुळे बिग बॉसने घरातल्यांना शिक्षाही केली आहे. कारण घरातल्या स्पर्धकांची एका आठवड्याची इम्युनिटी काढून घेतली असून या आठवड्यात कॅप्टन्सी टास्क होणार नाही. त्यामुळे पुन्हा घरातल्यांनी एकमेकांवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता बिग बॉस मराठीच्या पहिल्याच आठवड्याचा विकेंडचा वार म्हणजेच भाऊचा धक्का पार पडणार आहे. या भाऊच्या धक्क्यावर कुणाला धक्का बसणार याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

आता भाऊच्या धक्क्यावर कुणाची पोलखोल होणार याचीही उत्सुकता अनेकांना लागून राहिलीये. त्यामुळे बिग बॉसच्या घरात सुरु असलेल्या राड्यांवरुन रितेश कुणाला झापणार आणि कुणाच्या खेळाचं कौतुक करणार हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. घरात पार पडलेल्या नॉमिनेशनच्या टास्कवर रितेश काय सांगणार याचीही उत्सुकता आहेच. पण पहिल्याच आठवड्यात घराच्या बाहेर कोण जाणार याचीही उत्सुकता अनेकांना लागून राहिलीये. दरम्यान पहिल्या आठवड्यात घरात काय काय घडलं ते जाणून घेऊयात. 

पहिल्या आठवड्यात घरात काय काय झालं? 

वर्षा-निक्कीचा वाद

बिग बॉस जेव्हा सांगतात की, आता बेडचा वापर करायला परवानगी नाही. तेव्हा वर्षा उसगांवकर या बिग बॉसला म्हणतात की, चुकून झालं. त्यावर निक्की भडकते आणि ती म्हणते आता आम्हाला भोगावं लागतंय ना. तुमच्यामुळे आम्हाला जमीनीवर झोपावं लागतंय. त्यावर वर्षा उसगांवकर तिला म्हणतात की, माझ्या एकटीमुळे झोपावं नाही लागत आहे. जेव्हा तुम्ही झोपला होता, तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? निक्कीला वर्षा उसगांवकर म्हणतात की, ओरडू नकोस, त्यावर निक्कीही म्हणते की, तुम्ही शांत बसा. 

बिग बॉसच्या घरात नॉमिनेशनची तोफ धडाडली

'बिग बॉस मराठी'मध्ये स्पर्धकांना घरात टिकून राहण्यासाठी हुशारीने टास्क खेळावे लागतात. प्रीमियरपासूनच 'बिग बॉस'ने स्पर्धकांना पेचात पाडले आहे. 'बिग बॉस मराठी' सुरू होऊन चार दिवस पूर्ण झाले असून चौथ्या दिवशीच घरात पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडलं. नॉमिनेशनची तोफ' असं या पहिल्या नॉमिनेशन कार्याचं नाव होतं.  प्रतिस्पर्ध्याला घराबाहेर काढण्यासाठी 'बिग बॉस'ने 'नॉमिनेशन तोफ' या कार्याचा अवलंब करण्यात आला. 

निक्की अंकिताचा राडा 

कोकण हार्टेड गर्ल अंकितावर निक्कीने आधीच नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर नॉमिनेशन टास्कमध्ये  अंकिता आणि निक्कीमध्ये कडाक्याची भांडणं झालं. स्पर्धकांना एका चौकानाभोवती उभे राहायचे असते आणि खेळ पूर्ण करायचा असतो. अंकिताच्या समोर निक्की येऊन उभी राहते. त्यावेळी अंकिता तिला हटकते. अंकिता निक्कीला उचलते आणि तुला असे बाजूला करू का असे विचारते. यावर निक्की माझा हात कसा चालतो हे दाखवू असे म्हणते. त्यानंतरही शाब्दिक बाचाबाची होत असते. अंकिता निक्कीला वैतागून दुसऱ्या जागी उभी राहते. पण, निक्कीदेखील तिथेचे येते. हे पाहून अंकिता पुन्हा जागा बदलते. त्याचवेळी पु्न्हा मला हात लावला तर तुझे तोंड खलबत्यात ठेचेल अशी धमकी देते. निक्कीकडून होणारी कोंडी पाहता अंकिता गेमच्या बाहेर जाते आणि सोफ्यावर बसून रडते.

योगिता आणि जान्हवी किल्लेकरमध्ये वादाची ठिणगी

 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये पहिल्याच नॉमिनेशन टास्कमध्ये योगिता आणि जान्हवीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं. नॉमिनेशनवरुन जान्हवी म्हणते,"योगिताने मुर्खासारखं कारण न देता नॉमिनेट केलं आहे". दरम्यान योगिता म्हणते,"जान्हवी मी तुझ्यासारखं मुर्खासारखा हा शब्द वापरलेला नाही. तू तोंडावर वेगळी आहेस आणि मागे वेगळी वागतेस, असं थेट सुनावते. तर यावर जान्हवी म्हणते,"पण मला योग्य कारण तर दे". त्यावर योगिता म्हणते,"बिग बॉस'ने सांगितल्यानुसारच मी नॉमिनेट केलं असल्याचे कारण तिने दिले. 

निक्की आणि आर्यामध्ये फाईट

आर्या आणि निक्की वाद होतात, तेव्हा आर्या निक्कीला म्हणते की, तुला घाबरायला पाहिजे.त्यावर निक्की आर्याला म्हणते की, तू फट्टू आहेस एक नंबरची. त्यामध्येच निक्की आणि अरबाजमध्येही हडतुड झाली. त्यामुळे या वादात घरातल्या इतर सदस्यांनी देखील उडी घेतली.

जान्हवी-आर्यामध्ये वातावरण टाईट

जान्हवी-आर्यामध्ये धक्काबुक्की झाल्याचंही पाहायला मिळालं. दरम्यान  जान्हवी म्हणते,"नॉमिनेशनदरम्यान आर्या किती फडफड करत होती". त्यावर आर्या म्हणते,"माझ्यामध्ये तुम्ही आता येऊ नका". तर जान्हवी आर्याला म्हणते,"किती दिवस 'बिग बॉस मराठी'च्या घरात राहतेस ना तेच बघते मी". त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायल मिळत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

आधी हक्काचं घर....आता नवी कोरी कार..महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील 'या' कलाकाराचं आणखी एक स्वप्न पूर्ण!

महत्त्वाच्या बातम्या

The Kapil Sharma Show Comedian: 'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
TV Show C.A.T.S. : 32 एपिसोड, 3 अभिनेत्री; दोघींनी आयुष्याचा दोर कापला, एक इंडस्ट्रीतून गायब, 'ती' शापित मालिका कोणती?
32 एपिसोड, 3 अभिनेत्री; दोघींनी आयुष्याचा दोर कापला, एक इंडस्ट्रीतून गायब, 'ती' शापित मालिका कोणती?
Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget