एक्स्प्लोर

Shooting Guidelines : सेटवर मास्क सक्तीचा, सोशल डिस्टन्सिंग 6 फुटांचे, चित्रिकरणासाठी नवे नियम

Shooting Guidelines : लॉकडाऊन काळात चित्रिकरणं सुरू व्हावीत म्हणून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नवी नियमप्रणाली जाहीर केली आहे.आता चित्रिकरण करायचं असेल तर हे नियम पाळूनच चित्रिकरण करावं लागणार आहे.

मुंबई : लॉकडाऊन काळात चित्रिकरणं सुरू व्हावीत म्हणून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नवी नियमप्रणाली जाहीर केली आहे. आता सिनेमा, टीव्ही आणि वेबसीरीज यांना चित्रिकरण करायचं असेल तर हे नियम पाळावे लागणार आहेत. यात सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग यांच्या सूचना आहेतच. पण आता नव्या नियमावलीनुसार सेटवरच्या प्रत्येकाला मास्क सक्तीचा असणार आहे. केवळ कॅमेऱ्यासमोर उभे असणाऱ्या कलाकारांनाच मास्क काढता येणार आहे. मेकअप आणि हेअर ड्रेसरला पीपीई किट बंधनकारक  केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही नवी नियमावली जारी केली आहे. यात सेटवरच्या सर्वांनी फेस कव्हर आणि मास्क वापरणं सक्तीचं असणार आहे. तर मेकअप आणि हेअर करणाऱ्यांनी पीपीई किट घालणं बंधनकारक असणार आहे. कॉलर माईक्स शक्यतो वापरले जाऊ नयेत किंवा वापरले गेलेच तर ते इतर कुणाची शेअर होऊ नयेत असंही यात सांगण्यात आलं आहे. चित्रिकरणासाठी लागणाऱ्या प्रॉपर्टीसुध्दा कमीतकमी वापरल्या जाव्यात आणि त्या वापरण्यापूर्वी त्याचं निर्जंतुकीकरण करणं सक्तीचं असणार आहे. 6 फुटांचं अंतर पाळावं लागणार याशिवाय, चित्रिकरण स्थळी एडिटिंग रूममध्ये आणि रेकॉर्डिंग रूम स्थळी किमान 6 फुटांचं अंतर पाळावं लागणार आहे. चित्रिकरण करायचं दृश्य, कॅमेरामन, क्रू पोझिशन्स, बसायची व्यवस्था, खानपानाच्या व्यवस्था असलेल्या ठिकाणी हा नियम पाळावा लागणार आहे. सेटवर कमीतकमी कलाकार आणि तंत्रज्ञ असावेत. बाहेरील कोणालाही सेटवर येण्याची परवानगी नसावी. सर्वत्र सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाव. सेटवर प्रवेश आणि गमन ही ठिकणं निश्चित करावीत. सेट, व्हॅनिटी व्हॅन्स, मेकअप रूम्स आदी ठिकाणी वारंवार सॅनिटायझेशन बंधनकारक असणार आहे. सेटवर ग्लोव्हज, बूट, मास्क, पीपीई यांची व्यवस्था असावी. सर्वांकडे आरोग्य सेतू अॅप आसावा,असे नियम यात करण्यात आले आहेत.  ज्येष्ठ कलाकारही सेटवर येऊ शकणार कोरोनाला आळा घालण्यासाठी हे नवे नियम करण्यात आले आहेत. आता ज्येष्ठ कलाकारही सेटवर येऊ शकणार आहेत. त्या कलाकारांचीही योग्य काळजी घेतली जावी, असं यात सुचवण्यात आलं आहे. सॅनिटायझेशन, त्यांची बसण्याची व्यवस्था, खानपानाची व्यवस्था इथे सर्वत्र फिजिकल डिस्टन्सिंग पाळलं जाणं गरजेचं असल्याचंही यात म्हटलं आहे. आता चित्रिकरण करायचं असेल तर हे नियम पाळूनच चित्रिकरण करावं लागणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लक्ष्मीपूजनाला कोकणासह मराठवाड्यात जोरदार सरी, अवकाळी पाऊस दिवाळीचा विचका करणार? हवामान खात्याचे हाय अलर्ट कुठे ?
लक्ष्मीपूजनाला कोकणासह मराठवाड्यात जोरदार सरी, अवकाळी पाऊस दिवाळीचा विचका करणार? हवामान खात्याचे हाय अलर्ट कुठे ?
Video: यूपीत भाजप नेत्यानं इथला मंत्री तुझा बाप आहे म्हणत तरुणाची आई बहिण काढली; पोलिसांच्या डोळ्यादेखत नाक घासून माफी मागायला लावली
Video: यूपीत भाजप नेत्यानं इथला मंत्री तुझा बाप आहे म्हणत तरुणाची आई बहिण काढली, कार फोडली, पोलिसांच्या डोळ्यादेखत नाक घासून माफी मागायला लावली
ट्रम्पनी धमकी देताच मोदींनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध थांबवलं, याला कोणती 'नमक हरामी' म्हणायची? 'सामना'तून भाजप, गिरीराज सिंहांचे वाभाडे काढले
ट्रम्पनी धमकी देताच मोदींनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध थांबवलं, याला कोणती 'नमक हरामी' म्हणायची? 'सामना'तून भाजप, गिरीराज सिंहांचे वाभाडे काढले
Mumbai News: मुंबईत मोठ्या घातपाताचा कट? 'त्या' घरात सापडले ‘अणुबॉम्ब डिझाइन’शी संबंधित 14 नकाशे; नेमकं काय घडलं?
मुंबईत मोठ्या घातपाताचा कट? 'त्या' घरात सापडले ‘अणुबॉम्ब डिझाइन’शी संबंधित 14 नकाशे; नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Morning Prime Time : Superfast News : 9 AM : सुपरफास्ट बातम्या : 22 OCT 2025 : ABP Majha
First Look: 'घरात लक्ष्मी आली' म्हणणाऱ्या Deepika-Ranveer ने अखेर दाखवला लेक Dua चा चेहरा!
Pune Padwa Row: 'कार्यक्रमात घुसणाऱ्या जिहादी लोकांना आमचा विरोध आहे', हिंदुत्ववादी संघटनांचा इशारा
Pune Namaz Row: 'खासदार मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करा', अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरेंची मागणी
Sushma Aandhare : जैन बोर्डिंग हाऊसवरुन लक्ष विचलित करण्यासाठी राडा;अंधारे,जलील यांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लक्ष्मीपूजनाला कोकणासह मराठवाड्यात जोरदार सरी, अवकाळी पाऊस दिवाळीचा विचका करणार? हवामान खात्याचे हाय अलर्ट कुठे ?
लक्ष्मीपूजनाला कोकणासह मराठवाड्यात जोरदार सरी, अवकाळी पाऊस दिवाळीचा विचका करणार? हवामान खात्याचे हाय अलर्ट कुठे ?
Video: यूपीत भाजप नेत्यानं इथला मंत्री तुझा बाप आहे म्हणत तरुणाची आई बहिण काढली; पोलिसांच्या डोळ्यादेखत नाक घासून माफी मागायला लावली
Video: यूपीत भाजप नेत्यानं इथला मंत्री तुझा बाप आहे म्हणत तरुणाची आई बहिण काढली, कार फोडली, पोलिसांच्या डोळ्यादेखत नाक घासून माफी मागायला लावली
ट्रम्पनी धमकी देताच मोदींनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध थांबवलं, याला कोणती 'नमक हरामी' म्हणायची? 'सामना'तून भाजप, गिरीराज सिंहांचे वाभाडे काढले
ट्रम्पनी धमकी देताच मोदींनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध थांबवलं, याला कोणती 'नमक हरामी' म्हणायची? 'सामना'तून भाजप, गिरीराज सिंहांचे वाभाडे काढले
Mumbai News: मुंबईत मोठ्या घातपाताचा कट? 'त्या' घरात सापडले ‘अणुबॉम्ब डिझाइन’शी संबंधित 14 नकाशे; नेमकं काय घडलं?
मुंबईत मोठ्या घातपाताचा कट? 'त्या' घरात सापडले ‘अणुबॉम्ब डिझाइन’शी संबंधित 14 नकाशे; नेमकं काय घडलं?
Pune Saras Baug: अखेर पुण्याच्या सारसबागेत राडा झालाच, धक्का लागल्याने दोन गट भिडले, पोलिसांची मध्यस्थी
अखेर पुण्याच्या सारसबागेत राडा झालाच, धक्का लागल्याने दोन गट भिडले, पोलिसांची मध्यस्थी
Pune Shanivar Wada: शिवाजी महाराजांनी कधी नमाज पठणाला विरोध केला नाही मग शनिवारवाड्यातील नमाजला विरोध का? इम्तियाज जलील यांचा सवाल
शिवाजी महाराजांनी कधी नमाज पठणाला विरोध केला नाही मग शनिवारवाड्यातील नमाजला विरोध का? इम्तियाज जलील यांचा सवाल
Bhai Jagtap on BMC Election 2026: काँग्रेस BMC निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत लढणार नाही, भाई जगताप यांचा दावा
काँग्रेस BMC निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत लढणार नाही, भाई जगताप यांचा दावा
Maharashtra Live blog: पुण्यातील सारसबागेत पाडवा पहाट, हिंदुत्त्ववादी संघटनांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त
LIVE: पुण्यातील सारसबागेत पाडवा पहाट, हिंदुत्त्ववादी संघटनांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त
Embed widget