Sherlyn Chopra : तारीख पे तारीख... साजिद खान विरोधात शर्लिन चोप्राची सुनावणी सतत लांबणीवर
Sherlyn Chopra On Sajid Khan : साजिद खानवर आरोप करणारी अभिनेत्री शर्लिन चोप्रा नुकतीच जुहू पोलिस स्टेशनमध्ये तिचा जबाब नोंदवण्यासाठी पोहोचली होती. मात्र, पोलिसांनी तिच जबाब नोंदवण्यास नकार दिला.

Sherlyn Chopra On Sajid Khan : अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) पुन्हा एकदा #MeToo प्रकरणात आरोपी चित्रपट निर्माते साजिद खान (Sajid Khan) विरोधात तक्रार देण्यासाठी मुंबईतील जुहू पोलिस ठाण्यात पोहोचली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शर्लिनला अश्रू अनावर झाले. ती म्हणाली, 19 ऑक्टोबरला पोलिसांकडे तक्रार पत्र देऊनही, पोलिसांनी त्यांचा कोणताही अहवाल नोंदविला नाही.
शर्लिन चोप्रा म्हणाली की, लैंगिक छळाचा मोठा आरोपी साजिद खानवर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तसेच आणि पोलिसांनी त्याला लवकरात लवकर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले पाहिजे. शर्लिन पुढे म्हणाली की, ही घटना जरी 2005 मध्ये घडली असली तरी माझ्याबरोबर काय झाले आणि या घटनेचा माझ्यावर काय परिणाम झाला हे शब्दात वर्णन करणे माझ्यासाठी खूप कठीण आहे."
एबीपी न्यूजशी बोलताना शर्लिन म्हणाली की, पोलिसांचे म्हणणे आहे की, लैंगिक छळाच्या विरोधात जबाब नोंदविण्यासाठी महिला पोलिस अधिकाऱ्याने पोलिस ठाण्यात हजर राहणेही खूप महत्त्वाचे आहे. मात्र, सध्या महिला अधिकारी स्टेशनवर हजर नाही. आज जेव्हा ती पोलिस स्टेशनमध्ये जबाब द्यायला येत आहे, तेव्हा तिने आधीच एका महिला अधिकाऱ्याची व्यवस्था करायला हवी होती.
शर्लिनच्या म्हणण्यानुसार, 'पोलिस कर्मचाऱ्याने साजिद खानविरोधात तक्रार आणि वक्तव्य न नोंदवणे धक्कादायक आहे. शर्लिनचे म्हणणे आहे की तिने जुहू पोलिसांकडे तक्रार आणि स्टेटमेंट रेकॉर्ड न केल्याबद्दल एसीपी आणि डीसीपी यांच्याशी संपर्क साधला आहे आणि त्यांची मदत घेतली आहे.
जोपर्यंत पोलिस तिची जबानी नोंदवत नाहीत तोपर्यंत ती जुहू पोलिस ठाण्यातून परतणार नसल्याचे शर्लिनने म्हटले आहे. शर्लिनने काही वेळापूर्वी साजिद खानच्या विरोधात केलेले ट्विटही एबीपी न्यूजला दाखवले आणि त्यात तिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांच्या सर्व उच्च अधिकाऱ्यांना टॅगही केले. 12 आणि 19 ऑक्टोबर रोजी शर्लिन चोप्राने एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत दावा केला होता की, 'साजिद खानने तिला 2005 मध्ये एका चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने एका ठिकाणी बोलावले आणि तिच्याशी आक्षेपार्ह वक्तव्य केले'. शर्लिन चोप्राने तिच्या सर्व आरोपांचा पुनरुच्चार करताना, तिने सर्व कलमांबद्दल कॅमेर्यावर सांगितले ज्यामध्ये तिने एका लेखी अर्जाखाली साजिदविरुद्ध तक्रार करण्याची विनंती केली आहे.
शर्लिनचे म्हणणे आहे की, पोलिसांनी आश्वासन दिले आहे की, ते तिचे गुन्हा नोंदवण्यासाठी तिला लवकरच पोलिस ठाण्यात बोलावतील आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी साजिद खानलाही पोलिस ठाण्यात बोलावले जाईल. दरम्यान, जुहू पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एबीपी न्यूजला सांगितले की, सध्या शर्लिनचा लेखी अर्ज स्वीकारण्यात आला असून तिच्या बाजूने साजिदवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
