सीपीआर दिला, नाडी चालू होती पण ..' शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर 3 महिन्यांनी पतीनेच केला उलगडा
पराग त्यागी याने youtube चैनल वरील एका मुलाखती दरम्यान या अफवांवर स्पष्टीकरण दिले आहे .अँटी एजिंग औषधांच्या अफवांचे खंडन करत ही अर्धवट माहिती असल्याचं त्याने सांगितलं आहे .

Shefali Jariwala: अभिनेत्री शेफाली जरीवाला 27 जून 2025 रोजी आपल्या चाहत्यांना सोडून निघून गेली .काटा लगा गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेफालीने वयाच्या 42 व्या वर्षी हार्ट अटॅक मुळे प्राण सोडला .त्यानंतर लगेचच शेफालीचा मृत्यू अँटीएजिंग उपचारांशी संबंधित असल्याच्या बातम्या पसरू लागल्या .पण आता तीन महिन्यानंतर शेफालीच्या पतीने अभिनेता पराग त्यागी याने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं सांगत या अफवा फेटाळून लावले आहेत . पराग त्यागी याने youtube चैनल वरील एका मुलाखती दरम्यान या अफवांवर स्पष्टीकरण दिले आहे .अँटी एजिंग औषधांच्या अफवांचे खंडन करत ही अर्धवट माहिती असल्याचं त्याने सांगितलं आहे .
शेफालीचे मृत्यूपूर्वीचे शेवटचे शब्द ..
पराग त्यागीने त्याच्या पोडकास्ट मध्ये शेअर केले की ज्या दिवशी शेफाली गेली त्या दिवशी त्याला काहीतरी चुकीचे घडणार असल्याचे जाणवत होते .शेफालीने त्याला त्यांच्या कुत्र्याला फिरायला घेऊन जाण्यास सांगितले होते कारण त्यांच्या घरातील नोकर राम थकला होता .पराग सिंबाला घेऊन जेव्हा परतला तेव्हा कंपाउंडर नाही त्यांना सांगितले शेफाली बेशुद्ध पडली आहे आणि तिला श्वास घेण्यास त्रास होत आहे . तिला इलेक्ट्रोलाईट पाणी आणि सीपीआर देण्याचा प्रयत्न केला .ती पुन्हा जिवंत होऊ शकते असं वाटलं पण नंतर कळलं की शेफालीने पूर्णपणे हार मानली होती . सीपीआर दिल्यानंतर ती थोडा श्वास घेऊ लागली .त्यानंतर तिला डॉक्टरांकडे आम्ही घेऊन गेलो .तिचा रेटिना तपासला .आधी तिची नाडी तपासली .नाडी दोनदा आली पण तिचे शरीर पूर्णतः हार मानू लागले होते .पराग म्हणाला, तिने दोन वेळा श्वास घेतला .पण ती पूर्णपणे हरली होती .मी तिला उचलू शकलो नाही .
अँटी एजिंग औषधांवरून पराग म्हणाला ..
शेफालीच्या मृत्यूनंतर पसरलेल्या अफवांवर परागने स्पष्टीकरण दिले असून शेफालीचा मृत्यू अँटी एजिंग औषधांमुळे झाल्याचा दावा त्याने फेटाळून लावला आहे - तो म्हणाला, ती नियमितपणे मल्टी विटामिन घ्यायची आणि कधी कधी विसरायची .त्यामुळे ती महिन्यातून एकदा आईव्ही ड्रीप घेत असे .मल्टी विटामिन मध्ये विटामिन सी, कोलेजन ,ग्लुटाथिओन आणि इतर अनेक अँटिऑक्सिडंट होते . ती तिच्या वयापेक्षा तरुण दिसत होती कारण त्यासाठी ती कठोर परिश्रमही करत होती .तिने तिच्या आहारावर नियंत्रण ठेवले होते .पण दर रविवारी चायनीज खायची .असं पराग म्हणाला .























